शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

China rare earth mineral: इलेक्ट्रिक वाहनांचे हृदय चीनच्या चुंबकाने थांबविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 16:28 IST

1 / 7
इलेक्ट्रिक वाहनांचे हृदय मानले जाणारे, तसेच प्रवासी कारांसह विविध उपकरणांमध्ये वापरले जाणारे दुर्मीळ पृथ्वी चुंबक चीनकडून आयात करण्यासाठी वाहन उद्योगाने सरकारची मदत मागितली आहे.
2 / 7
विविध देशांतर्गत पुरवठादारांनी चीनमधील त्यांच्या स्थानिक विक्रेत्यांद्वारे आधीच चीन सरकारकडून मंजुरी मागितली आहे. मात्र, ती मिळालेली नाही.
3 / 7
डेलॉइट इंडिया कंपनीचे भागीदार आणि वाहन क्षेत्राचे प्रमुख रजत महाजन यांनी सांगितले की, ही कमतरता विशेषतः इलेक्ट्रिक वाहनांच्या पुरवठा साखळीसाठी मोठा अडथळा ठरते आहे.
4 / 7
दुर्मीळ पृथ्वी चुंबकांच्या जागतिक प्रक्रिया क्षमतेच्या ९० टक्क्यांहून अधिक चीन नियंत्रित करतो, असे महाजन म्हणाले.
5 / 7
चार एप्रिलपासून सात दुर्मीळ पृथ्वी घटक आणि संबंधित चुंबकांसाठी विशेष निर्यात परवाने बंधनकारक करून चीन सरकारने निर्बंध लादले आहेत. चीनच्या निर्बंधांमुळे सुझुकी मोटरने जपानमध्ये त्यांच्या स्विफ्ट कारचे उत्पादन आधीच थांबवले आहे.
6 / 7
वाहनांत कशासाठी वापर? तर पॉवर स्टेअरिंग सिस्टमसाठी. एबीएस सेन्सर, फ्रैंकशाफ्ट सेन्सर, कॅमशाफ्ट सेन्सरसाठी.
7 / 7
गाडीचे स्पीकर्स व इन्फोटेनमेंट सिस्टमसाठी. हायब्रिड आणि ईव्ही बॅटरीला अधिक कार्यक्षम करण्यासाठी. इलेक्ट्रिक वाहनांत रीजेनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टमसाठीही वापरले जातात.
टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरElectric Carइलेक्ट्रिक कारchinaचीनIndiaभारत