धक्कादायक..पैसे देऊन लोक खरेदी करताहेत कोरोना व्हायरस; डब्यात बंद करून आणताहेत मृत्यू!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 03:28 PM2020-03-03T15:28:40+5:302020-03-03T15:35:57+5:30

कोरोना व्हायरसमुळे जगभरात दहशतीचं वातावरण पसरलं असून भारतातही कोरोनाचे ५ रुग्ण आढळून आले आहेत.

कोरोना व्हायरस चीनपाठोपाठा संपूर्ण जगासाठी धोकादायक बनला आहे. चीनच्या वुहान शहरातून पसरलेला कोरोना आता अन्य देशातील शहरांकडे वळला आहे.

भारतातही कोरोना व्हायरसचे ५ रुग्ण आढळून आल्याने खळबळ माजली आहे. दिल्ली, तेलंगणा, राजस्थान या भागात कोरोना व्हायरस रुग्ण आढळलेत.

सिंगापूर, दक्षिक कोरिया, उत्तर कोरिया, इराण आणि जपानसोबत यूरोप देशांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव वाढला आहे.

अमेरिकेनेही कोरोना व्हायरसपासून बचावासाठी खबरदारी घेतली आहे. कोरोना जगातील सर्व देशांसाठी संकट बनला आहे.

थायलँडमध्येही कोरोना व्हायरसचे ४० हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पर्यटन क्षेत्रावर याचा मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे

एकीकडे जगातील देश कोरोना व्हायरसपासून वाचण्याचा प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे थायलँड येथे याबाबत हलगर्जीपणा समोर आला आहे. कोरोना व्हायरसपासून बचावासाठी मास्क लावणं गरजेचे आहे.

मात्र थायलँडमध्ये वापरलेले मास्क पुन्हा पाण्याने धुवून प्रेस करुन त्याची पॅकेजिंग करण्यात येत आहे. थायलँडच्या साराबुरी प्रोविन्स कंपनीत हे वापरलेले मास्क पुन्हा विकण्यात येत असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे.

२ मार्च रोजी पोलिसांनी अवैधरित्या मास्क रिसाइकिलिंग करणाऱ्या कंपनीवर धाड टाकली. पोलिसांनी याठिकाणी ६ लोकांना अटक केली आहे.

वापरलेले मास्क अशाप्रकारे पॅकेजिंग करण्यात येतात जेणेकरुन ते नवीन वाटतील.

मात्र आतापर्यंत किती मास्क विकण्यात आले याची आकडेवारी नसल्याने थायलँड प्रशासन चिंतेत आहे.

एका दिवसाला जवळपास २५० मास्क विकण्यात येतात. हे प्रकरण समोर आल्याने यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. आरोग्य विभागाकडून आरोपींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.