अवघ्या 3 मिनिटांत कोट्यवधींच्या अलिशान गाड्यांचा चेंदामेंदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 21:19 IST2018-02-07T13:55:35+5:302018-02-07T21:19:00+5:30

जर तुम्ही कारप्रेमी असाल तर हे फोटो पाहून तुम्हाला नक्कीच दुःख होईल.
फिलिपाईन्सच्या मनीला येथील हे फोटो आहेत.
पोर्शे, मर्सिडीज आणि जॅगुआर यांसारख्या अलिशान गाड्या येथे बुल्डोजरखाली चिरडण्यात आल्या.
या सर्व कार बेकायदेशिररीत्या फिलिपाईन्समध्ये आणण्यात आल्या होत्या.
फिलिपाइन्सचे अर्थमंत्री कार्लोस डोमिंगुएज यांनी दिलेल्या माहितीनुसार या कार कर चुकवून फिलीपाइन्समध्ये आणण्यात आल्या होत्या.
फिलिपाईन्समध्ये अशाप्रकारे 20 गाड्यांचा चेंदामेंदा करण्यात आला. स्वतः राष्ट्रपती रॉड्रिगो दुतेर्ते हे देखील यावेळी उपस्थित होते.