#BestOf2017: महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2017 05:12 PM2017-12-23T17:12:18+5:302017-12-23T17:15:51+5:30

डोनाल्ड ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड - अमेरिकेत बराक ओबामा यांच्या जागी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड अमेरिकन जनतेने केली आणि त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. 21 जानेवारी रोजी ट्रम्प यांनी पदभार स्वीकारुन कार्यकाळास प्रारंभ केला.

उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी व तणाव - 21 फेब्रुवारी रोजी उत्तर कोरियाने जपान समुद्रात क्षेपणास्त्र चाचणी करुन पुन्हा नवा गोंधळ निर्माण केला. क्षेपणास्त्र चाचणींवरुन वर्षभरात अमेरिका आणि उत्तर कोरिया यांचे उत्तर- प्रत्युत्तर देणे सुरूच राहिले.

येमेनमधील कुपोषण - १० मार्च रोजी संयुक्त राष्ट्राने येमेन, सोमालिया येथिल कुपोषण व दुष्काळाबाबत चिंता व्यक्त केली. येमेन सध्या कुपोषणाच्या भीषण समस्येला तोंड देत आहे.

पॅरिस हवामान करारातून अमेरिकेची माघार - 1 जून रोजी पॅरिस हवामान करारातून अमेरिकेने माघार घेऊन सर्व जगाला धक्का दिला.

रोहिंग्या प्रश्नी म्यानमारवर जगाची टीका - जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून म्यानमारच्या रखाइन प्रांतातील रोहिंग्यांनी जीव मुठीत धरुन बांगलादेशच्या दिशेने पलायन सुरू केले. साधारणत: ८ लाख रोहिंग्या सध्या बांगलादेशात आश्रय छावणीत राहात आहेत. त्यांना परत घ्यावे यासाठी म्यानमारवर सर्व बाजूंनी दबाव टाकण्यात आला.

मुगबे यांची स्थानबद्धता व सत्तांतर - सलग 37 वर्षे झिम्बॉब्वे या देशाचे नेतृत्व करणारे राँबर्ट मुगाबे यांना 15 नोव्हेंबरला पदच्युत करण्यात आले.

संयुक्त राष्ट्रात भारत २०१७ साली पोर्तुगीज मुत्सद्दी अॅटोनियो ग्युटर्स यांची संयुक्त राष्ट्राच्या सरचिटणीसपदी निवड झाली. भारताने या वर्षात संयुक्त राष्ट्रात काही महत्त्वाच्या निवडणुका जिंकल्या. आंतरराष्ट्रीय कोर्टात भारताच्या दलवीर भंडारी यांनी सलग दुस-यांदा स्थान मिळवले. तर इंटरनँशनल ट्रायब्युनल फाँर द लाँ अँड सी या न्यायालयात पहिल्या भारतीय महिला न्यायाधीश होण्याचा सन्मान डाँ. नीरु चढ्ढा यांनी मिळवला.