मस्कतमधील 200 वर्ष जुन्या शिवमंदिरात मोदींच्या हस्ते अभिषेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 16:45 IST2018-02-12T16:43:02+5:302018-02-12T16:45:45+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओमानच्या दोन दिवसीय दौ-यावर असून यावेळी त्यांनी ओमानची राजधानी मस्कतमध्ये असलेल्या 200 वर्ष जुन्या शिवमंदिराचं दर्शन घेतलं.
मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अभिषेकही करण्यात आला.
हे शिवमंदीर आखाती देशामध्ये बरंच प्रसिद्ध आहे.
विशेष म्हणजे या शिवमंदिरात शिवलिंगाशिवाय हनुमानाचीही मूर्ती स्थापन करण्यात आली आहे.
हे मंदिर ओमानच्या सुल्तानच्या महालाशेजारीच आहे. या मंदिराला मोतीश्वर मंदिर म्हणूनही ओळखलं जातं.