16 वर्षीय अब्जाधिश तरुण, सलमानचा 'जबरा' फॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 18:41 IST2019-12-11T18:38:12+5:302019-12-11T18:41:01+5:30

तुम्हाला माहितीय का 17 वर्षांचा अब्जाधिश मुलगा, ज्याचं स्वत:च जेट विमान आहे. राशिद बेल्हासा असे या मुलाचे नाव असून तो दुबईत राहतो.
राशिद दुबईतील बांधकाम व्यावसायिक अब्जाधीश सैफ अहमद बेलहसा यांचा एकुलता मुलगा आहे. त्यामुळे त्यांचे राहणीमान पण खूप हायस्टँडर्ड आहे.
ज्या वयात मुलांना अभ्यासाचे टेंशन असते या वयात राशिद जगातल्या ख्यातनाम व्यक्तींसह हँगआउट्स करतोय.
राशिद हा सलमान खानचा खूप मोठा चाहता आहे आणि जेव्हा सलमान दुबईला जातो तेव्हा राशिद नक्कीच त्याला भेटायला जातो
रशिद अनेक वेळा मुंबईला भेट देऊन सलमान खानला अनेक वेळा भेटला आहे. राशिद इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर आणि यूट्यूबवर मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहे.