कुठल्या मॉडेलपेक्षा कमी नाही 'ही' महिला अधिकारी; UPSC परीक्षेत पटकावला नंबर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 04:14 PM2022-10-26T16:14:58+5:302022-10-26T16:20:56+5:30

आपल्या सर्वांना माहित आहे की, UPSC परीक्षा उत्तीर्ण होणे म्हणजे तारेवरची कसरत पार करण्यासारखं आहे. मात्र, अनेक विद्यार्थ्यांनी मेहनत आणि योग्य टाइमटेबल यावरून ही बाब चुकीची सिद्ध केली आहे. यात हरियाणात राहणाऱ्या देवयानी सिंगची कथाही खूप वेगळी आहे.

आठवड्यातून केवळ २ दिवस अभ्यास करून तिने UPSC सारखी खडतर परीक्षा उत्तीर्ण करत इतरांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. देवयानी सिंहने चंदीगडच्या शाळेतून १०वी आणि १२वीचे शिक्षण घेतले आहे.

१२ वी पूर्ण केल्यानंतर, देवयानीने २०१४ मध्ये पिलानीच्या बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्सच्या गोवा कॅम्पसमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग कोर्समध्ये प्रवेश घेतला. येथून तिने पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

अभियांत्रिकी पदवी प्राप्त केल्यानंतर, देवयानीने UPSC परीक्षा देण्याचे ठरवले, ज्यासाठी तिने लगेच तयारी सुरू केली. मात्र, देवयानीला इतके सहज यश मिळाले नाही. २०१५, २०१६ आणि २०१७ अशी सलग तीन वर्षे UPSC परीक्षेत अपयशी ठरल्यानंतर तिने चौथ्या प्रयत्नात यश संपादन केले. देवयानीला पहिल्या दोन प्रयत्नात यूपीएससी प्रीलिम्सही पास करता आली नाही. तिसऱ्या प्रयत्नात ती मुलाखत फेरीपर्यंत पोहोचली, पण तिचे नाव अंतिम यादीत आले नाही.

असे असूनही देवयानीने हार मानली नाही आणि २०१८ मध्ये चौथा प्रयत्न केला. यानंतर तिने UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि संपूर्ण भारतात २२२ वा क्रमांक मिळवला. देवयानी यांना त्यांच्या पदानुसार केंद्रीय लेखापरीक्षण विभागात नियुक्त करण्यात आले होते. नियुक्ती झाल्यानंतर त्यांचे प्रशिक्षण सुरू होईल.

देवयानी तिच्या रँकवर खूश नव्हती, म्हणून तिने पुन्हा एकदा यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रशिक्षणामुळे तिला परीक्षेच्या तयारीसाठी जास्त वेळ देता आला नाही. अशा स्थितीत ती फक्त शनिवार व रविवारच्या दिवशीच परीक्षेचा अभ्यास करू शकत होती. आठवड्यातून दोन दिवस तयारी केल्यानंतर, देवयानीने २०१९ मध्ये परीक्षा उत्तीर्ण करत संपूर्ण भारतात ११ वा क्रमांक मिळवला.