सिद्धेश्वर धरण शंभर टक्के भरले; सहा दरवाजे उघडून विसर्गास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 07:35 PM2021-08-18T19:35:34+5:302021-08-18T19:41:41+5:30

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यामध्ये असलेले सिद्धेश्वर धरण ( Siddheshwar Dam ) शंभर टक्के भरले आहे. पाण्याची आवक वाढत असल्याने धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक अद्यापही सुरु आहे.

औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर येथे पूर्णा नदीवर सिद्धेश्वर धरण आहे.

धरण क्षेत्रात मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे आवक वाढली. यामुळे धरण 100% क्षमतेने भरले.

तसेच धरणामध्ये मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. यामुळे प्रशासनाने धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला.

धरणाच्या १४ गेट पैकी 6 गेटचे दरवाजे एक फूट उंचीने उघडण्यात आले.

याद्वारे पूर्णा नदी पात्रात चार हजार 368 व क्युसेस पाणी विसर्ग केला जात आहे. धरणाचे दरवाजे बुधवारी सकाळी ९ वाजता उघडण्यात आले आहेत.

त्यापूर्वी मंगळवारी पूर्ण प्रकल्प भागातील नदीकाठच्या हिंगोली,परभणी जिल्ह्यातील ३० गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.

सध्या सहा दरवाज्यातून विसर्ग सुरु असून. पाऊस अधिक व्होऊन आवक वाढल्यास धरणाचे आणखी दरवाजे उघडले जाणार असल्याची माहिती अभियंता भूषण कनोज यांनी दिली आहे.