मधुचंद्राच्या रात्री दुध पिण्यामागे आहेत ही ३ कारणं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 07:27 PM2018-01-10T19:27:01+5:302018-01-10T19:32:07+5:30

आपल्याकडे अनेक गोष्टींशी निगडीत बरेच रिती रिवाज आणि प्रथा आहेत. आपल्याला त्यामागचं कारण माहीत नसेल तरी आपण ते पाळत आलोय. पण यापैकी बऱ्याच परंपरांमागे काही चांगली कारणं असतात. त्यापैकीच एक म्हणजे मधुचंद्राला पत्नीने पतीला ग्लासभर दुध पाजणे.

१) दुधाला पवित्र आणि सात्विक मानलं जात असल्याने या नवविवाहीत जोडप्याने आपल्या नव्या आयुष्याची चांगली सुरुवात करताना दुध प्यायलं जावं, असं म्हणतात.

२) आपल्याकडे लग्न हा २ ते ३ दिवस चालणारा कार्यक्रम आहे. त्यादरम्यान हे दोघेही फार थकलेले असतात. त्यांच्या शरिराची झीज भरून निघावी म्हणून दोघांनी दुध पिणं अपेक्षित असतं. त्यात सुका मेवा किंवा केसर टाकून प्यायल्यास ते पौष्टीक बनतं.

३) दुधातील घटक शारिरीक थकवा दूर करुन कामभावना उत्तेजित करत असल्याने मधुचंद्राच्या रात्री दुध प्यायलं जातं. योग्य प्रमाणात प्यायलेलं दूध कामोत्तेजना देत असल्याने शारिरीक संबंध प्रस्थापित करताना चांगला स्टॅमिना मिळतो. थोडक्यात काय तर इतक्या दिवसांच्या थकव्याचा परिणाम न होता मधुचंद्राचा अनुभव सुखद करण्यासाठी त्या रात्री दुध प्यायलं जातं.