West Nile Virus: कोरोनानंतर आता ‘वेस्ट नाइल व्हायरस’चा धोका; रशियाचा जगाला इशारा, WHO सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 07:48 PM2021-08-31T19:48:37+5:302021-08-31T19:53:16+5:30

West Nile VIrus: कोरोनानंतर आता जगात आणखी एक व्हायरसनं डोकं वर काढलं आहे. रशियानं याबाबत जगाला सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

एकीकडे जगावर कोरोना व्हायरसचं संकट उभं राहिलं आहे. गेल्या २ वर्षापासून चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोनानं अक्षरक्ष जगभरात हाहाकार माजवला आहे. लाखो लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले. अनेकांचे जीव गेले. त्यानंतर व्हायरस नियंत्रण आणण्यासाठी लस उत्पादन करण्यात आली.

यातच रशियानं जगाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. जगात आता वेस्ट नाइल व्हायरल(West Nile virus) आजार पसरण्याची भीती रशियानं व्यक्त केली आहे. बदतल्या हवामानामुळे जलवायू परिवर्तनामुळे हा आजार मच्छरांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचू शकतो.

जर स्थिती गंभीर राहिली तर हा डोक्यातील आजार म्हणजे इनसेफलाइटिस अथवा मेनिनजाइटिस होण्याची शक्यता जास्त आहे. कारण पावसाळ्यात मच्छरांची उत्पत्तीमुळे हा व्हायरस वेगाने पसरण्याची शक्यता अधिक आहे. रशियाच्या कंज्यूमर हेल्थ वॉचडॉगमध्ये हे सांगितले आहे.

सध्या जगभरात वेस्ट नाइल व्हायरस पसरण्यासाठी धोकादायक वातावरण आहे. अनेक देश मग त्यात अमेरिका, युरोप, चीन अथवा अन्य देश सगळीकडे पावसाचा ऋतू आहे. त्यामुळे मच्छरांची उत्पतीमुळे हा व्हायरस पसरण्याची शक्यता आहे. रशियात वेस्ट नाइल व्हायरस ८० टक्के प्रकरणं दक्षिण पश्चिम परिसरातून समोर आले आहेत.

वेस्ट नाइल व्हायरल काय आहे? हा एक संक्रमित आजार आहे जो मच्छरांमुळे पसरतो. पक्षांपासून माणसांपर्यंत हा आजार संक्रमित होतो. हा व्हायरस क्यूलेक्स मच्छर घेऊन फिरतात. जर हा आजार गंभीर झाला तर माणसाच्या मेंदूसंबंधित आजार होण्याची शक्यता आहे. किंवा डोक्यात ताप गेल्यानं मृत्यूचाही धोका आहे. त्याला इनसेफलाइटिस किंवा मेनिनजाइटिस म्हटलं जातं.

वेस्ट नाइल व्हायरस या आजारावर कुठलाही खास उपचार नाही. अनेक प्रकारच्या उपचार पद्धती आणि प्रक्रियाद्वारे रुग्णांना ठीक करता येऊ शकतं. त्यात सुई, रेस्पिरेटरी सपोर्ट, ऑक्सिजन सिलेंडर अथवा अन्य संक्रमण रोखण्यासाठी जे उपचार केले जातात ते करावे लागतात.

जागतिक आरोग्य संघटनेच्या(WHO) मते, WNV चा संबंध जीका, डेंग्यू आणि यलो फिवर आजाराशी आहे. जगभरात मच्छरांमुळे होणाऱ्या आजारांचे २० टक्के केस समोर येऊ शकतात. ज्या लोकांना WNV चं संक्रमण होतं अशांना ताप, डोकेदुखी, अंगदुखी, त्वचेवर डाग अशी लक्षणं दिसतात. हे काही दिवस अथवा काही आठवडे कायम राहतात.

WHO नुसार, WNV पहिल्यांदा यूगांडामध्ये १९३७ मध्ये शोधून काढला होता. त्यानंतर १९५३ मध्ये हा व्हायरस नाइल नदीच्या डेल्टा परिसरात कावळ्यांसह अन्य पक्षांमध्ये आढळला होता. १९९७ मध्ये हा व्हायरस केवळ पक्षांसाठी धोकादायक मानला जायचा. त्याचवेळी इस्त्राईलमध्ये विविध प्रजातीच्या पक्षांमध्ये इनसेफलाइटिस आणि लकवा आजार आढळला.

मागील ५० वर्षापासून WNV नं आजारानं विविध देशातील लोकांमध्ये संक्रमित केले आहे. अलीकडे अमेरिकेतील काही भागात या व्हायरसची बातमी आली होती. हा व्हायरस लोकांच्या मेंदूमध्ये प्रवेश केला तर तो जीवघेणा ठरू शकतो. मेंदूत सूज येणे, अतिताप, अंगदुखी होते. मेंदूच्या चहुबाजुने असलेल्या हड्डींना नुकसान पोहचवलं जातं.

डॉक्टर WNV चा निष्कर्ष फिजिकल चाचणी, मेडिकल हिस्ट्री अथवा लॅबमधून करतात. याचा सर्वात जास्त धोका लहान मुलं आणि वृद्धांना असतो. अथवा ज्या लोकांची इम्युन सिस्टम खूप कमकुवत आहे. यासाठी कोणताही विशेष बचाव नाही. पारंपारिक पद्धतीने नव्या तंत्रज्ञानाने मच्छारांपासून बचाव करणं गरजेचे आहे. जर मच्छर येत असतील तर त्यापासून बचाव करण्याची गरज आहे.