कोविड संक्रमणापासून बचावासाठी फायदेशीर ठरतात ३ व्यायाम प्रकार; लवकर रिकव्हर होण्याचा सोपा उपाय

Published: May 11, 2021 07:34 PM2021-05-11T19:34:53+5:302021-05-11T20:00:23+5:30

3 types of exercise : हाताच्या स्नायूंची क्षमता सुधारण्यासाठी दररोज कमीतकमी 5 मिनिटे आर्म-वर्कआऊट करणे आवश्यक आहे.

कोरोना संक्रमणाला दूर ठेवण्यासाठी लोक वेगवेगळ्या उपायांचा अवलंब करत आहेत. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनापासून स्वतः चा बचाव करण्यासाठी शारीरिक तसेच मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं. लहान सहान गोष्टी निष्काळजीपणा करणं गंभीर लक्षणांचे कारण ठरू शकते. म्हणून आज आम्ही तुम्हाला कोरोना संक्रमितासांठी काही सोपे वर्कआऊट्स सांगणार आहोत. या वर्कआऊट टिप्सचा वापर करून तुम्ही संक्रमणाची तीव्रता कमी करू शकता.

लीसेस्टर युनिव्हर्सिटी द्वारे करण्यात आलेल्या अभ्यासात तज्ज्ञांनी सांगितले की कोविड -19 सारख्या रोगांवर व्यायामाचे चांगले परिणाम दिसून आले आहेत.

वर्कआऊट्सनंतर, संक्रमित व्यक्तीस श्वास घ्यायला त्रास होणं, थकवा आणि अशक्तपणा यासारख्या समस्यांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली.

अभ्यासाच्या तज्ञांनी असे नमूद केले आहे की दररोज चालणे हा सर्वात चांगला आणि सोपा व्यायाम आहे. कोरोनापासून संरक्षणासाठी लॉकडाउन असताना आपण घरामध्ये, गच्चीवर, बागेत किंवा ट्रेडमिलवर देखील हा व्यायाम करू शकता. एक तास चाला आपल्याला 200-350 कॅलरी बर्न करण्यास मदत करू शकते. कोविडच्या अनेक लक्षणांसाठी हा उत्तम उपाय ठरेल.

या व्यतिरिक्त काही व्यायामांचे प्रशिक्षण घेऊन आपल्याला फायदा देखील मिळू शकेल. यासाठी आपण वेट लिफ्टिंगसारखे व्यायाम करू शकता, घाबरू नका आपल्याला जिममध्ये जाण्याची किंवा हेवीवेट उचलावा लागणार नाही. आपण हे सहज घरी देखील करू शकता. १ ते २ किलो घरगुती वस्तूंसह आपण असे व्यायाम देखील करु शकता. हाताच्या स्नायूंची शक्ती सुधारण्यासाठी दररोज कमीतकमी 5 मिनिटे आर्म-वर्कआऊट करणे आवश्यक आहे.

पाय बळकट करण्यासाठी स्क्वॅट्स आणि लंज यासारखे व्यायाम खूप फायदेशीर मानले जातात.

पायांच्या व्यायामासाठी आपल्या व्यायामाच्या प्रोग्राममधून एक दिवस काढा. अशा अर्ध्या तासाच्या व्यायामामुळे आपणास 90 कॅलरी बर्न करता येते. हे सर्व व्यायाम कोविडमुळे उद्भवणारे अशक्तपणा आणि इतर लक्षणे बरे करण्यात खूप उपयुक्त असल्याचे आढळले आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!