आई वडिलांची एक चूक नडली, मुलाला झाला गंभीर आजार; हाताचे बोट कापावे लागले, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 11:55 IST2025-11-17T11:43:33+5:302025-11-17T11:55:08+5:30

प्रत्येक आई वडील आपल्या मुलांच्या आरोग्याची खूप काळजी घेतात, मुलाला एखादी समस्या होऊ नये याचा ते प्रयत्न करतात. परंतु बऱ्याचदा नकळत अशी काही चूक घडते, जी मुलाच्या जीवावर बेतते. काही चुका इतक्या गंभीर असतात की, मुलाच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो.

असाच काही प्रकार १३ वर्षीय मुलासोबत घेडला आहे. ज्याच्या आई वडिलांच्या एका चुकीमुळे त्याची प्रकृती चिंताजनक बनली. परिस्थिती इतकी बिकट झाली की त्याच्या हाताचे बोटही कापावे लागले. अखेर ही चूक काय होती, मुलाची अवस्था एवढी खराब कशी झाली हे जाणून घेऊ.

इन्स्टाग्राम व्हिडिओमध्ये बालरोगतज्ञ डॉ. पवन मांडवीय एका मुलाला दाखवत म्हणतात, "हा मुलगा ४ वर्षांचा आहे आणि त्याचे नाव श्रेयांश आहे. तो १३ दिवसांपूर्वी आपत्कालीन परिस्थितीत आमच्याकडे आला होता."

डॉक्टर सांगतात की, मूल पूर्णपणे कडक झाले होते. त्याचा संपूर्ण जबडा बंद झाला होता. त्याचे शरीर, हात, पाय आणि इतर सर्व काही ताठ झाले होते. याला धनुर्वात म्हणतात. जेव्हा एखाद्या मुलाला दुखापत किंवा जखमेमुळे संसर्ग होतो आणि धनुर्वाताचे इंजेक्शन वेळेवर दिले जात नाही तेव्हा हा आजार होतो.

जेव्हा दुखापतीनंतर टिटीचे इंजेक्शन दिले जात नाही तेव्हा टिटनेस नावाचे जीवाणू त्या ठिकाणी सक्रिय होतात. यामुळे जखमेत गंभीर संसर्ग झाला, ज्यामुळे गँगरीन झाला. मुलाची प्रकृती इतकी बिकट झाली की बोट कापावे लागले असं बालरोग तज्ञांचे म्हणणे आहे.

या आजारामुळे मुलाचे संपूर्ण शरीर ताठ होते. त्याचे जबडे बंद होतात, त्याचे हात आणि पाय घट्ट होतात आणि श्वास घेण्यास त्रास होतो. जर वेळेवर उपचार मिळाले नाहीत तर मुलाची प्रकृती झपाट्याने बिघडू शकते आणि जीवघेणी देखील होऊ शकते असा इशाराही डॉक्टरांनी दिला.

डॉक्टरांनीही चूक कुठे झाली हे सांगितले, आमच्या क्लिनिकमध्ये दाखल करण्यापूर्वी मुलाला विजेचा धक्का बसला होता. घरी खेळत असताना त्याने फ्रीजला स्पर्श केला आणि त्याला विजेचा धक्का बसला. दुखापतीनंतर त्याच्या पालकांनी जखमेवर मलमपट्टी केली, परंतु टीटी इंजेक्शन देण्यात आले नाही. जी सर्वात मोठी चूक आहे असं डॉक्टरांनी सांगितले.

जेव्हा मुलाला आमच्याकडे आणले, त्याची प्रकृती चिंताजनक होती. त्याला ५ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवले. हळूहळू औषध उपचारांना प्रतिसाद देत त्याचे शरीर पुन्हा सामान्य झाले. सातत्याने ट्रिटमेंट दिल्यानंतर मुलाच्या प्रकृतीत सुधारणा झाली. आता तो पूर्णपणे बरा होत आहे असं डॉक्टरांनी म्हटलं.

हे मूल आमच्याकडे येऊन १३ दिवस झाले आहेत आणि त्याची प्रकृती आता खूपच चांगली आहे. तो डिस्चार्जसाठी योग्य आहे असं डॉक्टर म्हणाले. परंतु पालकांनी नेहमी लक्षात ठेवावे की जर मुलांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली तर त्यांना ताबडतोब टीटीचं इंजेक्शन द्यावे. ही छोटीशी खबरदारी गंभीर धोका टाळू शकते.