WHO नं अविश्वास दाखवल्यानंतरही रशियाच्या लसीवर 'या' देशांचा विश्वास; लवकरच लस विकत घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 12:39 PM2020-08-16T12:39:45+5:302020-08-16T12:58:51+5:30

रशियाने जगातील पहिली कोरोनाची लस तयार केल्याचा दावा केला आहे. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांनी दिलेल्या माहितीनुसार या लसीचे सगळ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. Sputnik V नावाची ही लस अमेरिकेसारख्या इतर अनेक देशांचा विश्वास अजूनही जिंकू शकलेली नाही. जागतिक आरोग्य संघटनेनंही रशियाच्या लसीवर विश्वास दाखवलेला नाही

रशियातील गमलेया रिसर्च इंस्टिट्यूटद्वारे विकसित करण्यात आलेली लस २ वर्षापर्यंत कोरोना व्हायरसविरुद्ध लढून रोगप्रतिकारकशक्ती वाढवू शकते. . असा दावा रशियाच्या आरोग्यमंत्रालयाकडून करण्यात आला आहे. तसंच काही देशांनी रशियाच्या लसीवर विश्वास दाखवत सकारात्मक पाऊलं उचलायला सुरूवात केली आहे.

व्हियतनामच्या स्थानिक माध्यमांच्या रिपोर्टनुसार शुक्रवारी व्हियतनामने रशियन कोविड १९ ची लसी खरेदी करण्यासाठी रजि्स्ट्रेशन केलं आहे. व्हियतनाम सुरुवातील या लसीचे १५० लाख डोज खरेदी करू शकतो. रशियाच्या या लसीबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार चाचणीच्या अंतीम टप्प्यात असलेल्या लसींमध्ये रशियाच्या लसीचा समावेश नाही.

इस्त्राईलच्या आरोग्य मंत्रालयाकडूनही लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. इस्त्राईलनं दिलेल्या माहितीनुसार सगळ्यात आधी या लसीची चाचणी केली जाईल त्यानंतर सकारात्मक परिणाम दिसून आल्यास ही लस खरेदी करण्यासाठी रशियाशी करार केला जाईल.

व्हियतनाम आणि इस्त्राईल व्यतिरिक्त फिलिपींस सुद्धा रशियाची लस खरेदी करण्यासाठी उत्सुक आहे. दरम्यान रशियात तय़ार झालेल्या लसीची चाचणी करण्यासाठी फिलिपींसकडून परिक्षण केलं जाणार आहे. त्यातून लसीच्या क्षमतेबाबत माहिती मिळवता येऊ शकते. हे ट्रायल ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे. एप्रिल २०२१ पर्यंत ही लस सर्वसामन्य लोकांपर्यंत पोहोचवता येऊ शकते.

रशियाच्या ३ हजारांपेक्षा जास्त वैद्यकिय क्षेत्रात करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून दिसून आलं की, जास्तीत जास्त डॉक्टरर्स लसीवर विश्वास दाखवत नाहीत. लसीबाबत पुरेशी माहिती नसल्यानं तसंच जलदगतीने लसीला मान्यता मिळाल्यामुळे असंतुष्ट आहेत.

डॉक्टर्स हैंडबुक' द्वार ३ हजार ४० डॉक्टरर्स आणि आरोग्य तज्ज्ञांवर आधारीत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात दिसून आलं की, ५२ टक्के वैद्यकिय तज्ज्ञांनी स्वतःवर चाचणी करून घेण्यास नकार दिला आहे. या सर्वेक्षणात २४.५ टक्के लोक स्वतःवर लसीकरण करून घेण्यास तयार झाले आहेत.

दरम्यान अमेरिकेने रशियाच्या लसीवर विश्वास दाखवलेला नाही. रशियानं तयार केलेली लस माकडांवर वापरत असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे.