शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

काही नवीन पदार्थ खाण्याची भीती वाटते? 'या' विचित्र आजाराची असू शकतात लक्षणे!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 9:55 AM

1 / 9
फोबिया वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. हा एकप्रकारची मानसिक समस्या आहे. म्हणजे कुणाला उंचीची भीती वाटते, कुणाला वेगाची भीती वाटते तर कुणाला विमानात बसण्याची भीती वाटते. तसाच काही लोकांमध्ये Food Fobia असतो. म्हणजे खाण्यासंबंधी मानसिक समस्या...
2 / 9
काय असतो हा फूड फोबिया? - फूड फोबिया झालेल्या व्यक्तीला जेवण, स्नॅक्स किंवा ड्रिंक्सची भीती वाटते. म्हणजे खासप्रकारच्या पदार्थांची भीती वाटते. ही समस्या खासकरून अशा पदार्थ किंवा डिशेजबाबत होते ज्या पहिल्यांदाच बघितल्या जातात किंवा खाण्याचा प्रयत्न करत असाल तर. (Image Credit : listverse.com)
3 / 9
हे होतं कसं?- ज्या लोकांमध्ये फोबिया असतो त्यांच्यासाठी हे तसंच असतं जसं एखाद्या नवीन व्यक्तीला भेटताना होतं. काही लोकांना गर्दी बघून भीती वाटते. त्याचप्रमाणे काही लोकांना खाण्या-पिण्याचे नवीन पदार्थ बघून भीती वाटते. यालाच फूड फोबिया म्हणतात.
4 / 9
अवघड असतं.... - कधी तरी लक्ष देऊन बघा की, लोक किंवा तुम्ही स्वत: कशाप्रकारचे पदार्थ सिलेक्ट करता. जवळपास सगळेच त्यांच्या मूडनुसार पदार्थ सिलेक्ट करतात. पण आपल्या लोकांमध्ये असेही काही लोक असतात ज्यांना केवळ वातावरणामुळे किंवा मूडमुळे नाही तर मानसिक कारणानेही होतं. (Image Credit : catersnews.com)
5 / 9
दुसऱ्यांना पाहून वाढते हिंमत - फूड फोबियाने शिकार असलेले लोक त्यांच्या कुटूंबातील लोकांना आणि मित्रांना काहीतरी नवीन खाताना बघतात, तेव्हा त्यांच्यात सुद्धा नवीन पदार्थ ट्राय करण्याची हिंमत येते. पण हे लोक स्वत:हून एखादी नवीन डिश ट्राय करायला घाबरतात. असं असलं तरी ही एक सामान्य समस्या आहे. याला घाबरण्याची अजिबात गरज नाही. (Image Credit : clinicalhypnotherapy-cardiff.co.uk)
6 / 9
काही समस्या होते का? - एकीकडे फूड फोबियाने शिकार असलेले लोक नवीन पदार्थ खाण्याला घाबरतात, तेच अनेकदा ते काही खास पदार्थांबाबत सिलेक्टीव असतात. म्हणजे ते काही ठराविक पदार्थच सिलेक्ट करतात आणि त्याशिवाय दुसरं काही खाणं पसंत करत नाहीत. यामुळे या लोकांमध्ये पोषक तत्वांची कमतरता असते.
7 / 9
...म्हणून ट्रीटमेंट करणं गरजेचं - जेव्हा एखादी व्यक्ती जास्त काळापर्यंत ठराविकच पदार्थ खातात तेव्हा त्यांच्या शरीरात वेगवेगळ्या व्हिटॅमिन्स आणि न्यूट्रिएंड्सची कमतरता होते. त्यामुळे फूड फोबियाने ग्रस्त लोकांना इतर शारीरिक आणि मानसिक समस्या होऊ शकतात. या समस्या होऊ नये म्हणून वेळीच उपाय करणं गरजेचं असतं. (Image Credit : mirror.co.uk)
8 / 9
सोपा आहे उपाय - फूड फोबियापासून सुटका मिळवणं फारच सोपं आहे. काही मोजकी औषधं आणि काउन्सेलिंगच्या माध्यमातून ही समस्या दूर केली जाऊ शकते. यासाठी तुम्हाला एखाद्या सायकॉलॉजिस्टची भेट घ्यावी. फूड फोबियाकडे जास्त काळापासून दुर्लक्ष करत असाल तर याने तुम्हाला डायबिटीसची देखील समस्या होऊ शकते.
9 / 9
रिसर्च काय सांगतात? - फूड फोबियाला नियोफोबिया नावानेही ओळखलं जातं. यावर वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी रिसर्च केले आहेत. त्यात त्यांनी सांगितले की, नियोफोबियामुळे व्यक्तीची भूक प्रभावित होते. याने पुढे जाऊन त्यांचं मेटाबॉलिज्म डिस्टर्ब होतं. जास्त काळ हीच स्थिती राहिली तर तुम्हाला कुपोषण आणि शुगरसारखी समस्याही होऊ शकते. (Image Credit : spoonuniversity.com)
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स