इशारा! पॅरासिटामोलच्या ओव्हरडोजमुळे लिवरला गंभीर धोका, जाणून घ्या साइड इफेक्ट्स....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 09:47 AM2021-02-03T09:47:48+5:302021-02-03T09:56:06+5:30

तशी तर पॅरासिटामोल जास्तीत जास्त लोकांसाठी सुरक्षित मानली जाते. पण या औषधाच्या ओव्हरडोजचे साइड इफेक्टही अनेक आहेत.

पॅरासिटामोल एक सामान्य पेनकिलर औषध आहे ज्याचा वापर वेदनेपासून आणि तापापासून सुटका मिळवण्यासाठी केला जातो. शरीराचं तापमान कमी करण्यासाठी पॅरासिटामोलचा अधिक वापर केला जातो. नॅशनल हेल्थ सर्व्हिसनुसार, सामान्यपणे एका व्यक्तीला २४ तासात चार वेळा किंवा ५०० एमजीच्या दोन टॅबलेटही दिल्या जाऊ शकतात.

तशी तर पॅरासिटामोल जास्तीत जास्त लोकांसाठी सुरक्षित मानली जाते. पण या औषधाच्या ओव्हरडोजचे साइड इफेक्टही अनेक आहेत. नॅशनल हेल्थ सर्व्हिस(इंग्लंड)यांच्यानुसार, याचा हेपाटोटॉक्सिक डोज गिंळकृत केल्यावर काही तासातच उलटी किंवा मळमळ सारख्या समस्या होऊ शकतात.

हेपाटोटॉक्सिक एक मेडिकल टर्म आहे ज्यात ओव्हरडोजमुळे होणाऱ्या समस्येमुळे लिव्हर डॅमेजही होऊ शकतं. NHS नुसार, एका सिंगल पॅरासिटामोल ओव्हरडोजआधी किंवा दुसऱ्या दिवशी लिव्हर फेल्युअरमुळे सुस्ती किंवा चक्कर येण्याची शक्यता कमी राहते. त्यामुळे दुसऱ्या कारणांवरही लक्ष द्यावं.

इंटरनॅशनल हेल्थ केअर कंपनी Bupa नुसार, पॅरासिटामोलच्या ओव्हरडोजचा धोका सहजपणे वाढू शकतो. कारण अनेक प्रकारची औषधे आणि प्रॉडक्ट्समध्ये पॅरासिटामोल असतं. खासकरून कोल्ड आणि फ्लू च्या औषधांमध्ये हे असतंच.

एक्सपर्ट सल्ला देतात की, कोणतंही औषध घेण्याऐवजी त्याबाबत योग्य माहिती घ्या. तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की, कोणत्या औषधासोबत किती पॅरासिटामोल घेत आहात. औषधाच्या रॅपरवर असलेली माहिती निट वाचा. जर काही प्रश्न असेल तर फार्मासिस्टला विचारा.

पॅरासिटामोलचा ओव्हरडोज आपल्या लिव्हरला डॅमेज करू शकतो. हे फार घातक आहे. त्यामुळे ओव्हरडोजची समस्या झाल्यावर अर्जंट मेडिकल फॅसिलिटीवर लक्ष द्या. पब्लिक हेल्थ इंग्लंडनुसार, एसीटायलसिस्टीनच्या माध्यमातून पॅरासिटामोलचा ओव्हरडोजचा धोका कमी केला जाऊ शकतो. PHE नुसार, ही औषधे ओव्हरडोजच्या ८ तासांच्या आत लिव्हर डॅमेजपासून बचाव करण्यासाठी १०० टक्के प्रभावशाली आहे.

८ तासांचा वेळ गेल्यावर एसीटायलसिस्टीनचा प्रभाव बराच कमी होतो. एका सीमित वेळेच्या आत एसीटायलसिस्टीनच्या माध्यमातून हेपेटोटॉक्सिसिटीला यशस्वीपणे रोखलं जाऊ शकतं. इतका वेळ निघून घेल्यावर रूग्णाची स्थिती अधिक वाईट होऊ शकते.

कुणी घेऊ नये पॅरासिटामोल? - तशी तर पॅरासिटामोल सर्वच लोकांसाठी सुरक्षित आहे. पण आरोग्य बघून काही लोकांनी हे घेणं टाळलं पाहिजे. Bupa नुसार, लिव्हरच्या समस्येचा सामना करत असलेल्या लोकांनी पॅरासिटामोल घेऊ नये.

Bupa ने इशारा देत सांगितले की, जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशरची समस्या असेल तर सॉल्यूबल पॅरासिटामोल घेऊ नये जी पाण्यात विरघळते. अशाप्रकारे पॅरासिटामोलमध्ये फार जास्त प्रमाणातत सॉल्ट असतं. ज्याने तुमचं ब्लड प्रेशर अधिक वाढू शकतं.

Read in English