पुरूषांमधील टेस्टोस्टोरॉन हार्मोन आणि कोरोना विषाणू यांच्यातील संबंध जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 06:52 PM2020-05-15T18:52:35+5:302020-05-15T19:09:01+5:30

कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस जगभरात वाढत चालला आहे. महिलांच्या तुलनेत पुरूषांना कोरोना व्हायरसची लागण होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. अलिकडे करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये दिसून आलं की ज्या पुरूषांमध्ये टेस्टोस्टेरोचा स्तर कमी असतो. अशा रुग्णांना कोरोना व्हायरसमुळे मृत्यू होण्याचा धोका जास्त असतो. हा अभ्यास जर्मनीतील University Medical Center Hamburg-Eppendorf च्या संशोधकांकडून करण्यात आला होता.

सायन्स टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार हा रिसर्च व्हायरसने इन्फेक्टेड असलेल्या ४५ रुग्णांवर करण्यात आला होता. ज्यात ३५ पुरूष आणि १० महिलांचा समावेश होता. या रुग्णांना आयसीयूत भरती करण्यात आलं होतं. त्यातील नऊ पुरूष आणि तीन महिला ऑक्सिजनवर आणि ३३ रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.

३५ पुरूषांपैकी ३ तृतीयांश पुरूषांमध्ये जवळपास ६९ टक्के सेक्स हार्मोन्स टेस्टोस्टेरॉनची कमतरता होती. हा सेक्स हार्मोन शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरत असतो. त्या अभ्यासात समाविष्ट असेलल्या महिलांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी जास्त होती.

या हार्मोनशिवाय शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती योग्यप्रकारे काम करू शकत नाही. यामुळे जीवघेण्या साइटोकिन स्टॉर्म चा धोका वाढू शकतो. जेव्हा रोगप्रतिकारकशक्ती कोणत्याही आजाराला मारण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा टेस्टोस्टेरॉनच्या कमतरतेमुळे या प्रक्रियेत बाधा निर्माण होते. त्यामुळे साइटोकिन स्टॉर्मची स्थिती उद्भवते.

पुरूषांमध्ये या हार्मोन्सची पातळी कमी असेल तर रोगप्रतिकारकशक्ती व्हायरसवर नियंत्रण करू शकत नाही. महिलांमध्ये या हार्मोन्सचं जास्त प्रमाण गंभीर आजारांचं कारणं ठरू शकतं.

हॅम्बर्गच्या Leibniz Institute for Experimental Virology चे प्रोफेसर गुल्साह ग्रेबियल यांनी डेली मेलला दिलेल्या माहितीनुसार ज्या पुरूषांमध्ये टेस्टोस्टोरॉनचं प्रमाण सामान्य असतं. त्यांना सायटोकीन स्टॉमचा धोका कमी असतो.

प्रोफेसर गेब्रियल यांनी सांगितले की, टेस्टोस्टोरॉनचा स्तर कमी झाल्यामुळे कोरोना व्हायरसचा धोका मोठ्या प्रमाणावर असतो. रिसर्चकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना रुग्णांचा मृत्यू फक्त फुफ्फुस खराब झाल्यामुळे नाहीतर रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्यामुळे होत आहे.

सायन्स टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार काही पुरूषांना हाइपोगोनाडिज्म हा आजार जन्मापासून असतो. म्हणून त्यांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन योग्य प्रमाणात तयार होत नाही. काही पुरूषांमध्ये टेस्टोस्टोरॉन तयार होण्याची प्रकिया संथगतीने सुरू असते. काहीवेळा या समस्येवर उपचार टेस्टोस्टेरोन रिप्लेसमेंट थेरेपी द्वारे केले जातात.

Read in English