कशासाठी पोटासाठी... 'या' पौष्टिक नाश्त्याने करा दिवसाची सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2018 13:22 IST2018-03-26T13:22:32+5:302018-03-26T13:22:32+5:30

दिवसाची सुरुवात करताना आरोग्याचा विचार करून अल्पोपहार करणं गरजेचं आहे. उपाशीपोटी दिवसाची सुरुवात केल्यास अनेक आजारांना निमंत्रण मिळतं. म्हणून जर तुम्ही नाश्ता न करता घाईघाईत घराबाहेर पडत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करताय. त्यासाठीच आम्ही तुम्हाला पटकन होणाऱ्या काही नाश्ताच्या रेसिपीज सांगणार आहेत.
१) ब्रेडला टोस्ट करून त्यावर केळ्याचे काप ठेवावेत आणि त्यावर तीळ भुरभुरावेत. चहाबरोबर किंवा कॉफीबरोबर हा नाश्ता तुम्ही कधीही करू शकता.
२)दुधामध्ये नारळाचा रस, दही, द्राक्षे आणि केळं यांचं मिश्रण एकत्रित करून सकाळी लवकर प्यावं. जेणेकरून पचनसंस्था नियमित होईल.
३)आपल्याकडे उपलब्ध असलेली सर्व फळे कापून त्यावर मध घालावा आणि ते सॅलेडसारखं खावं. त्यामुळे भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे मिळतील.
४)ब्रेडवर टोमॅटोचे, काकडीचे, बिटाचे काप ठेवावे व त्यावर चीज किसून सॅन्डविचसारखं खावं. यामुळे भरपेट नाश्ता होईल.
५)बदाम आणि अक्रोड यांचे बारीक तुकडे दुधात मिसळून प्यावं. या पौष्टिक पेयामुळे तुमची पचनसंस्था चांगली होईल आणि आरोग्यही उत्तम राहील.
६)दह्यामध्ये आपल्या घरात उपलब्ध असलेली फळे एकत्र करून त्यात साखर किंवा मध घालून खाल्ल्यास तुम्हाला दिवसभर थकवा जाणवणार नाही.