अन्नविषबाधा टाळण्यासाठी करा हे सोपे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 16:01 IST2018-07-19T15:52:32+5:302018-07-19T16:01:21+5:30

अन्नविषबाधा ही वरकरणी सामान्य बाब वाटत असली तरी कधी कधी जिवघेणी ठरू शकते. खालील छोटे छोटे उपाय करून अन्नविषबाधेपासून बचाव करता येऊ शकतो.

जेवण बनवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा.

स्वच्छ आणि चांगल्या धुतलेल्या भांड्यांमध्येच जेवण शिजवा.

मांस, मासे हे फळे आणि भाजीपाल्यापासून दूर ठेवा.

जेवण चांगले शिजवून घ्या. त्यामुळे अन्नपदार्थांमधील हानीकारक जिवाणू मरून जातात.

जेवण उघडे ठेवू नका

अनपदार्थांचा वास बदलला असेत तर असे पदार्थ खाणे टाळा.

पावसाळ्यामध्ये अपचनाची समस्या वाढते त्यामुळे चटपटीत खाणे टाळा