शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सावधान! हार्ट अटॅक आणि पॅनिक अटॅकमध्ये काय फरक, दोघांपैकी जास्त धोकादायक कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 2:56 PM

1 / 9
आज बदलत्या किंवा धकाधकीच्या जीवनशैलीमुळे लोक विविध आजारांना बळी पडत आहेत. गेल्या काही वर्षांत हार्ट अटॅकने मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. पूर्वी जास्त वयाच्या लोकांना हार्ट अटॅकने येत असे, तर आजच्या काळात तरुणांनाही हार्ट अटॅकच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. हार्ट अटॅकसोबतच पॅनिक अटॅकच्या समस्याही वाढत आहेत.
2 / 9
तज्ज्ञांच्या मते पॅनिक अटॅक हा हार्ट अटॅक इतकाच धोकादायक आहे. बर्‍याच वेळा लोकांना हार्ट अटॅक आणि पॅनिक अटॅक या दोन्ही गोष्टी समान वाटतात. रुग्णाला त्यामुळे नेमकं काय होत आहे हे समजत नाही. जर तुम्हालाही या दोघांमधला फरक कळत नसेल तर हार्ट अटॅक आणि पॅनिक अटॅकमध्ये फरक ते जाणून घेऊया.
3 / 9
जेव्हा व्यक्तीच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो किंवा धमन्या 100% ब्लॉक होतात, अशा स्थितीत व्यक्तीला हार्ट अटॅक येतो. हार्ट अटॅक येण्यापूर्वी अनेक प्रकारची लक्षणे माणसाला दिसतात.
4 / 9
छातीत दुखणं किंवा छातीत जडपणा जाणवणे हे सर्वात सामान्य लक्षण आहे. याशिवाय श्वास लागणे, घाम येणं किंवा उलट्या होणं ही सामान्य लक्षणं आहेत. ही लक्षणे लगेच किंवा काही तासांनंतर दिसतात.
5 / 9
तज्ञांच्या मते, पॅनिक अटॅक ही एक प्रकारची चिंता आहे, जी खूप गंभीर असण्यासोबतच अचानक विकसित होते. पॅनिक अटॅक दरम्यान हृदयाचे ठोके वाढणे, तसेच श्वासोच्छवासाचा त्रास, डोके दुखणं आणि शरीर थरथरणं इत्यादी लक्षणं दिसतात.
6 / 9
रिपोर्टनुसार, यूकेच्या आरोग्य तज्ञांनी सांगितले की हार्ट अटॅक आणि पॅनिक अटॅक या दोन्हींमध्ये छातीत दुखणं, श्वास घेण्यास त्रास होणं आणि घाम येणं अशी लक्षणं आहेत.
7 / 9
ब्रिटनच्या आरोग्य तज्ञांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये मुख्य फरक सांगितला की, पॅनिक अटॅक कधीही येऊ शकतो, मग तुम्ही आराम करत असाल किंवा झोपत असाल. तर तुम्ही जास्त काम करत असताना हार्ट अटॅक येतो.
8 / 9
जर तुम्हाला अचानक छातीत दुखत असेल, 2 ते 3 मिनिटांपेक्षा जास्त काळ दुखणं जाणवत असेल आणि वेदना इतर अवयवांमध्ये पसरत असेल, तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.
9 / 9
हार्ट अटॅक आल्यास कोणत्याही प्रकारचा उशीर घातक ठरू शकतो. तुम्हाला पुन्हा पुन्हा पॅनिक अटॅक येत असल्यास, योग्य उपचार घ्या, तुम्हाला लक्षणं नियंत्रित करण्यासाठी काही औषध दिले जाऊ शकतं. आरोग्याची नीट काळजी घ्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाHeart DiseaseहृदयरोगHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य