अभिनेत्याने १८ किलो वजन केलं कमी; किती दिवसात आणि कसं?, तुम्हीही वापरू शकता 'ही' ट्रिक By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 02:48 PM 2024-08-09T14:48:13+5:30 2024-08-09T14:59:24+5:30
कार्तिकचा डाएट आणि वर्कआउट प्लॅन फॉलो करून तुम्हीही वजन कमी करू शकता आणि निरोगी राहू शकता. तुम्हालाही वजन कमी करायचं असेल आणि तंदुरुस्त राहायचं असेल, तर बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने वापरलेल्या ट्रिक्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. कोणत्याही स्टेरॉईडशिवाय त्याने १८ किलो वजन कमी केलं आहे.
कार्तिकचा डाएट आणि वर्कआउट प्लॅन फॉलो करून तुम्हीही वजन कमी करू शकता आणि निरोगी राहू शकता. कार्तिक आर्यनने त्याचं वजन कसं कमी केलं आणि तुम्ही ही ट्रिक कशी वापरू शकता ते जाणून घेऊया.
अनेक महिने खाल्लं नाही गोड कार्तिकला १४ महिन्यांत १८ किलो वजन कमी करावं लागलं, म्हणून त्याने पहिली गोष्ट केली ती म्हणजे गोड खाणं सोडून देणं.
मिठाई, चॉकलेट्स, आईस्क्रीम अशा सगळ्या गोड गोष्टी त्याने जवळपास दोन वर्षे खाल्ल्या नाहीत. त्याने नो-शुगर डाइट फॉलो केलं आणि आपलं वजन नियंत्रणात ठेवलं.
डाएटमधून घेतला नाही ब्रेक कार्तिकने त्याच्या भूमिकेसाठी अतिशय कडक डाएट प्लॅन फॉलो केला होता. त्याने दररोज आपल्या डाएट प्लॅनचं पालन केलं आणि कोणत्याही दिवशी चीट मील केलं नाही. तो आपल्या आहाराबाबत अतिशय शिस्तबद्ध होता.
पोर्शन कंट्रोल कार्तिकने सांगितलं की, तो जे काही खायचा ते अगदी कमी प्रमाणात खायचा. तो सूप प्यायचा आणि छोटी फळे खायचा. पोर्शन कंट्रोल व्यतिरिक्त, त्याला अनेक अशा गोष्टी खाव्या लागल्या ज्या त्याने आधी कधीच खाल्ल्या नव्हत्या.
कार्तिकच्या आहारात टोफू, फ्लॉवर, भात, कोशिंबीर आणि सोयाबीनचा समावेश होता. सुमारे दीड वर्ष तो हे सर्व खात राहिला. प्रोटीनची गरज पूर्ण करण्यासाठी त्याने टोफूचं सेवन केलं.
या गोष्टी टाळल्या कार्तिकने पिझ्झा, बर्गर यांसारख्या मैद्यापासून बनवलेल्या वस्तूही टाळल्या. या गोष्टी टाळून त्याने वजन कमी केलं.
तुम्हीही वापरू शकता ट्रिक्स तुम्हीही कार्तिक आर्यन सारखं वजन कमी करण्याच्या ट्रिक्स वापरू शकता. त्यासाठी गोड खाणे सोडून द्या. मिठाई, चॉकलेट आणि आईस्क्रीमसारख्या गोष्टी तुमच्या आहारातून वगळा.
नो-शुगर डाइट घ्या. साखरेचे सेवन कमी करा किंवा पूर्णपणे बंद करा. जेवणाचे प्रमाण नियंत्रित करा आणि कमी खा. प्रोटीन्सचं सेवन करा आणि जंक फूड टाळा.
कार्तिक आर्यनने मेहनतीने १८ किलो वजन कमी केलं. आहारात बदल करून आणि रोजचा व्यायाम करून त्याने हे ध्येय गाठलं. तुम्हीही या ट्रिक्स फॉलो करून निरोगी आणि तंदुरुस्त राहू शकता.