India China FaceOff: भारतीय औषध उद्योगाविरोधात चीनचा छुपा डाव उघड; ‘या’ औषधाचा मोठा पुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 06:13 PM2020-06-18T18:13:10+5:302020-06-18T18:16:11+5:30

भारत सरकारने शोधून काढलं आहे की, चीन देशात एक अत्यंत महत्त्वाचे औषध पुरवत आहे. यामुळे त्या औषधाच्या देशांतर्गत उद्योगाला त्रास होत आहे. बॅक्टेरियाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी हे औषध अतिशय प्रभावी आहे. पण आत्ता चीन हे औषध भारतीय बाजारात पुरवत आहे जेणेकरुन भारतीय औषधनिर्माण उद्योगाचा मोठा तोटा होईल.

या औषधाचे नाव सिप्रोफ्लोक्सासिन हायड्रोक्लोराइड आहे. हे औषध त्वचा, हाडे, फुफ्फुसातील संक्रमण, मूत्रमार्गाच्या भागातील संसर्ग (यूटीआय) आणि काही प्रकारचे अतिसार बरे करण्यासाठी वापरले जाते.

सरकारने याची तपासणी केली असता असे दिसून आले की चीनमधून आयात केलेल्या सिप्रोफ्लोक्सासिन हायड्रोक्लोराईडचे प्रमाण भारतीय औषध बाजारात झपाट्याने वाढले आहे.

भारतात घरगुती वापरल्या जाणाऱ्या ९० % सक्रिय औषधी घटक चीनमधून आयात केले जातात. एवढेच नाही तर भारतात चीनमधून ९८ टक्के सिप्रोफ्लोक्सासिन हायड्रोक्लोराइडची निर्यात करतो.

औषध असोसिएशनच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर इंग्रजी वृत्तपत्र एचटीला सांगितले की, चिनी औषधापेक्षा घरगुती औषधाची किंमत प्रति किलो ३.३ डॉलर जास्त आहे. यामुळे, हे औषध चीनमधून मागवले जाते कारण तिथून येणारे औषध स्वस्त आहे.

डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेड रेमेडीज (डीजीटीआर) ने १५ जून रोजी तपासणीचा अहवाल दिला. यात म्हटलं आहे की, चीन ही औषध भारतात इतक्या मोठ्या प्रमाणात पाठवतो की, आता त्यावर अँटी-डम्पिंग ड्यूटी लावण्याची तयारी करत आहोत.

या औषधासंदर्भात सर्व संबंधित संस्था, कंपन्या आणि लोकांशी बोलल्यानंतर डीजीटीआर पुढील महिन्यात अँटी-डंपिंग ड्युटीबाबत निर्णय घेईल.

डीजीटीआर ही देशातील सरकारी संस्था आहे जी घरगुती औषध उद्योगांना चुकीच्या व्यवसाय पद्धतींपासून वाचवते आणि जे चुकीचे करतात त्यांना प्रतिबंध करते. देशांतर्गत औषध कंपन्या व व्यापाऱ्यांच्या तक्रारीवरून या संस्थेने यावर्षी जानेवारीमध्ये हे औषध टाकण्याच्या तपासणीस सुरुवात केली.

डीजीटीआर यावेळी त्या सर्व गोष्टींची तपासणी करत आहे जे मोठ्या प्रमाणात भारतात आणलं जातं. ज्या उत्पादनांची नावे व प्रमाण समोर येताच चीनविरूद्ध कठोर व्यापार कारवाई केली जाईल.

पाच वर्षांपूर्वीही डीजीटीआरने चीनमधील दोन डझनहून अधिक उत्पादनांवर अँटी डम्पिंग शुल्क लागू केले होते. ज्यामध्ये यूएसबी ड्राइव्हस्, स्टील, सौर पेशी, कॅल्क्युलेटरमधील व्हिटॅमिन ई सारख्या उत्पादनांचा समावेश होता. यावर्षी या शुल्काची मुदत संपुष्टात येत होती.

चीनच्या चुकीच्या व्यावसायिक कारवायांवर भारत सातत्याने कडक कारवाई करत आहे. जेणेकरून देशातील देशांतर्गत उत्पादन उद्योग शिल्लक राहील. तसेच मेक इन इंडिया मोहिमेला चालना दिली जाऊ शकते.