सांधेदुखीने त्रस्त आहात?; आहारातील 'हे' बदल ठरतील फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 11:23 AM2019-08-19T11:23:33+5:302019-08-19T11:35:07+5:30

सांधेदुखी ही जगभरातल्या अनेक लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांपैकी एक. इंग्रजीत आर्थ्रायटीस, अर्थातच संधीवात म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या आजाराचे शंभरहून अधिक प्रकार आढळतात. ज्यात सांधेदुखी आणि सांध्यांमधील वेदना ही प्रमुख लक्षणं असतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, स्त्री-पुरुषांमध्ये हा आजार आढळतो. प्रामुख्याने स्त्रियांमध्ये याचं प्रमाण अधिक असून, जसं वय वाढतं तसं आजाराचं प्रमाणही वाढलेलं दिसून येतं. (Image Credit : https://health.clevelandclinic.org)

सांधेदुखीने त्रस्त असणाऱ्या लोकांना सांध्यांमध्ये अनेक वेदना दिसून येतात. तसेच चालण्या-फिरण्यासही समस्या होतात. पण आहारात काही बदल करून तुम्ही यापासून सुटका करून घेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला काही अशाच सुपरफुड्सबाबत सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही सांधेदुखीचा समस्या दूर करू शकता.

दररोज 2 ते 3 चमचे ऑलिव्ह ऑइलचा आहारात समावेश केल्याने संधीवाताची समस्या कमी होऊ शकते. तुम्ही जेवणामध्ये नेहमीच्या तेलाऐवजी ऑलिव्ह ऑइलचा वापर करू शकता.

मोसंबी, संत्री, लिंबू यांसारख्या सिट्रस फ्रूट्समध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण अधिक असतं. जर तुम्हाला सांधेदुखीच्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर आहारामध्ये या फळांचा समावेश करणं फायदेशीर ठरतं. तसेच प्रयत्न करा की, तुमच्या आहारात जास्तीत जास्त फळं किंवा भाज्यांचा समावेश असेल.

दही संधीवातावर अत्यंत फायदेशीर ठरतं. शरीरातूव सूज दूर करण्यासाठी आणि अर्थरायटिसवर हे अत्यंत फायदेशीर ठरतं.

एक कप ग्रीन टीमध्ये पॉलिफिनॉल्स आणि इतर पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. संधीवाताच्या रूग्णांसाठी हे अत्यंत फायदेशीर असतं. यामध्ये मुबलक प्रमाणात अॅन्टीऑक्सिडंट असतात.

शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सर्वात उत्तम पदार्थ म्हणजे, ओट्स आणि हे सांधीवातावरही फायदेशीर ठरतं. सकाळच्या नाश्त्यामध्ये दलियाही अत्यंत फायदेशीर ठरतो.

आयुर्वेदातही हळदीचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. अल्टरनेटिव मेडिसिन रिव्यूने केलेल्या एका संशोधनामधून समोर आलेल्या निष्कर्षांनुसार, ऑस्टियोआर्थरायटिसच्या रूग्णांनी जर हळदीचा आहारात समावेश केला तर सांध्यांमधील वेदनांपासून सुटका होण्यास मदत होते. याशिवाय आलं, दालचिनी आणि लाल मिरच्याही फायदेशीर ठरतात.

होलग्रेन रक्तामधील CRP-C रिऐक्टिव प्रोटीनचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतं. याचा संबंध डायबिटीस आणि हृदयाच्या आरोग्यावरही होत असतो. त्यामुळे होलग्रेन ब्रेड तुमच्या ओव्हरऑल हेल्थसाठी उत्तम असतं.

लंडनमधील किंग्स कॉलेजच्या रिसर्चनुसार, योग्य प्रमाणात लसूण खाल्याने आर्थरायटिसचा धोका कमी होतो. तसेच तुम्ही कांद्याचाही आहारात समावेश करू शकता.

टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.