CoronaVirus : शरिरात कोरोना लसीचे दोन्ही डोस काम करत आहेत की नाही, हे कसं ओळखायचं? जाणून घ्या पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 09:25 PM2022-01-13T21:25:38+5:302022-01-13T21:30:52+5:30

ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना तिसऱ्या डोसची गरज आहे का? खरोखरच तिसऱ्या डोसची गरज आहे, की नाही, कसे ओळखावे? हे ओळखण्याची पद्धत काय? याला किती पैसे लागतात? जाणून घ्या...

देशभरातील फ्रंटलाइन वर्कर्स आणि गंभीर आजाराने ग्रस्त वृद्ध व्यक्तींना लसीचा तिसरा डोस म्हणजेच बूस्टर डोस दिला जात आहे. यापार्श्वभूमीवर लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. जसे, ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना तिसऱ्या डोसची गरज आहे का? खरोखरच तिसऱ्या डोसची गरज आहे, की नाही, कसे ओळखावे? हे ओळखण्याची पद्धत काय? याला किती पैसे लागतात?

खरे तर उपरोक्त सर्व प्रश्नांची उत्तरे केवळ एकाच टेस्टमध्ये मिळतात. या टेस्टला अँटीबॉडी टेस्ट, असे म्हटले जाते. अँटीबॉडी म्हणजे काय तर, जेव्हा एखादा व्हायरस आपल्या शरिरात प्रवेश करत त्याव्हा त्याच्याशी लढण्यासाठी काही प्रोटीन तयार होतात, जे व्हायरस प्रमाणेच आपल्या शरिरात असतात. अशा प्रोटीनलाच अँटीबॉडी म्हटले जाते.

शरिरात लस काम करते, की नाही? अँटीबॉडी टेस्टमध्ये समजते? - अँटीबॉडी टेस्टच्या माध्यमाने, आपल्याला मिळालेली लस पुरेशी आहे, की आपल्याला पुन्हा लस घ्यावी लागेल, हे समजते. जर आपण लसीचे दोन्ही डोस घेतले असतील आणि चाचणीनंतर आपल्या शरिरातील अँटीबॉडीज कमी झाल्या असतील, तर याचा अर्थ आपल्या शरिरातील लसीचा प्रभाव कमी झाला आहे. तसेच आपल्या शरिरात अधिक अँटीबॉडीज असतील, तर याचा अर्थ आपल्या शरिरात लस अजूनही काम करत आहे.

केवळ लस घेतल्यानेच अँटीबॉडी तयार होते का? तर नाही, केवळ लस घेतल्यानेच अँटीबॉडी तयार होत नाही, तर आप कोरोनातून बरे झाले असाल आणि नंतर अँटीबॉडीज टेस्ट केली, तर तेव्हाही आपल्या शरीरात अँटीबॉडी बनलेली दिसेल. यासंदर्भात आपण डॉक्टरांचाही सल्ला घेऊ शकता.

अँटीबॉडी टेस्टसाठी येतो एवढा खर्च - अँटीबॉडी टेस्ट करण्यासाठी जवळपास 500 ते 1000 हजार रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (DRDO) नुकतीच अँटीबॉडी टेस्ट साठी डिप्कोव्हॅन किट तयार केली होती. या किटची किंमत साधारणपणे 75 रुपये एढी होती. अँटीबॉडी टेस्ट केल्यानंतर त्याचा रिपोर्ट येण्यासाठी साधारणपणे 1 ते 2 तास लागतात.

महत्वाचे म्हणजे, आपण कोरोना संक्रमणातून रिकव्हर झाले असाल तर, साधारणपणे 2 आठवड्यांनंतर आपण अँटीबॉडी टेस्ट करू शकता. कारण बरे झाल्यानंतर साधारणपणे 13 ते 14 दिवसांनंतर आपल्या शरिरात अँटीबॉडीज तयार होतात. यासंदर्भात आधिक माहितीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचाही सल्ला घेणे महत्वाचे आहे.