सांधेदुखीचा त्रास दूर करण्यासाठी करा घरगुती उपाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 21:20 IST2019-04-18T21:16:09+5:302019-04-18T21:20:09+5:30

युरीक अॅसिड म्हणजेच सांधेदुखी हा त्रास आजकाल जवळपास सर्वांना होत असल्याचे दिसत आहे. साधारण पणे 30 वर्ष वयानंतर लोकांना हा आजार होतो. हे शरीरातील यूरिक अॅसिड तुटण्यामुळे होते. जे ब्लड सर्क्युलेशने किडनी पर्यंत पोचते आणि युरीन मार्गे बाहेर निघून जाते. युरीक अॅसिड वाढल्यानंतर ते शरीरात गाठ सारखे जमा होण्यास सुरुवात होते आणि वेगाने शरीरातील इतर भागात पसरते.

केळे – दिवसातून कमीत कमी 2 केळं खाल्ल्यानेही युरिक अॅसिड कमी होण्यास मदत मिळते.

फळे – आपल्या डाएटमध्ये फळांचा समावेश करावा, फळं खाल्ल्याने रक्तप्रवाहामध्ये तयार झालेला युरिक अॅसिड कमी होण्यास मदत मिळते

फळांचा ज्यूस- युरिक अॅसिडने पिडीत असलेल्यांनी फळांचा ज्यूस पिणं फायदेशीर ठरु शकतं.

फरसबीचा रस – फरसबीपासून काढलेला रस युरिक अॅसिडच्या रोगासाठी घरगुती उपाय आहे. दिवसातून दोनवेळा फरसबीचा रस पिल्याने युरिक अॅसिड कमी होण्यास मदत मिळते

युरिक अॅसिडच्या त्रासामध्ये न खाण्याचीच यादी मोठी असते, हा विचार करून कित्येक व्यक्ती पथ्य सोडून देतात आणि व्याधी वाढवून घेतात; परंतु खाण्याचे खूप उत्तम चविष्ट प्रकार युरिक अॅसिड कमी करताना दिसून येतात. यामध्ये हळदीचा उपयोग अधिक फायदेशीर आहे.

युरिक अॅसिडचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी दिवसा झोपू नये. वात विकारांमध्ये युरिक अॅसिडचा त्रास समाविष्ट असला तरी गरम पाण्याचे सेवन या व्यक्तींनी टाळावे. सुंठ, वावडिंग, पिंपळी घालून उकळलेल्या पाण्याचे सेवन केल्यास फायदेशीर असते.

















