ताकद मिळवण्यासाठी प्रोटिन सप्लिमेंट्स खाताय की विष? धक्कादायक माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 12:49 IST
1 / 10कोरोना महामारीच्या संकटानंतर लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलून गेल्या. लोक प्रोटिनयुक्त सकस आहारावर भर देऊ लागले. आहारात अधिक पोषणमूल्ये असलेले घटक वाढावे यासाठी प्रोटिन्स सप्लिमेंटसचे सेवन करू लागले.2 / 10परंतु देशात विकल्या जाणाऱ्या लोकप्रिय ३६ ब्रँडपैकी ७० टक्केहून अधिक प्रोटिन्सवर कंटेटबाबत चुकीचे लेबलिंग केले असून, १४ टक्केमध्ये घातक विषारी घटक आढळले.3 / 10प्रोटिन्स सप्लिमेंट्सबाबत केरळमधील डॉक्टरांनी केलेल्या संशोधनात ही बाब उघड झाली.4 / 1036 प्रथिने पावडरपैकी ७० टक्के नमुन्यांमध्ये वनस्पती आधारित मिश्रण आढळले. लेबलिंग चुकीचे आढळले. 5 / 1014 मिश्रणांपैकी सातमध्ये हर्बल अर्क होते. उर्वरित मिश्रणांमध्ये वाटाणा, सोया, अंडी, दूध, शेंगदाणे, आदींचे प्रथिने स्रोत आढळले. 6 / 1036 उत्पादनांपैकी नऊ उत्पादनांमध्ये ४० टक्क्यांहून कमी प्रथिनांचे प्रमाण आढळून आले, तर उर्वरित उत्पादनांमध्ये ६० टक्क्यांहून अधिक आढळले. 7 / 1025 पूरक प्रथिनांवर सामग्रीबद्दल चुकीचे लेबलिंग केले गेले होते. जाहिरात केलेल्या प्रमाणापेक्षा प्रथिनांचे प्रमाण १० ते १५ टक्के कमी होते.8 / 1036 पैकी पाच नमुने बुरशीयुक्त म्हणजे दूषित आढळले. काही नमुन्यांमध्ये हे प्रमाण १० मायक्रोग्रॅम प्रतिकिलोपेक्षा जास्त होते. 9 / 10दरम्यान, ८% नमुन्यांमध्ये कीटकनाशकांचे अंश आढळले. २० उत्पादने भारतात तयार केली, तर उर्वरित परकीय कंपन्यांनी बनवली होती. काही ब्रँड्समध्ये केल्या जात असलेल्या दाव्याच्या निम्म्या प्रमाणातही पोषक द्रव्ये आढळली नाहीत.10 / 10तर, ७०% हून अधिक प्रोटिन्सवर चुकीची माहिती आढळली. १४% आहारांमध्ये विषारी घटक दिसले. बहुतांश प्रोटिन सप्लिमेंटस् सुमार दर्जाची असून, त्यांच्या जाहिरातीत केले जाणारे दावेही फोल आहेत, असे अहवालात म्हटले आहे. गेल्या आठवड्यात हा अहवाल मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला.