शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

वैज्ञानिकांचा इशारा! लहान मुलांना हॅंड सॅनिटायजर देताय? जाऊ शकते डोळ्यांची दृष्टी...

By अमित इंगोले | Published: January 23, 2021 10:07 AM

1 / 9
कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी जगभरातील लोक अल्कोहोलपासून तयार सॅनिटायरचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. या सॅनिटायजरने भलेही तुम्ही कोविड-१९ ला रोखू शकता, पण लहान मुलांसाठी हे घातक ठरू शकतं. याने लहान मुलांचे डोळे निकामी होऊ शकतात. याचा खुलासा नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून करण्यात आला आहे.
2 / 9
फ्रान्समध्ये करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, अल्कोहोल बेस्ड सॅनिटायजर वापर केल्यावर २०२० मध्ये २०१९ च्या तुलनेत लहान मुलांचं आरोग्य खराब होण्याच्या घटना ७ टक्क्यांनी वाढल्या आहेत. यात सर्वात जास्त लहान मुलांचे डोळे खराब झाले आहेत.
3 / 9
वैज्ञानिकांनी इशारा दिला आहे की, जर चुकूनही सॅनिटायजर लहान मुलांच्या डोळ्यात गेलं तर ते आंधळे होऊ शकतात. फ्रेंच प्वाइजन कंट्रोल सेंटरच्या डेटाबेसनुसार, एक एप्रिल २०२० ते २४ ऑगस्ट दरम्यान हॅंड सॅनिटायजरशी संबंधित घटनांची संख्या २३२ होती.
4 / 9
गेल्यावर्षी या घटना केवळ ३३ होत्या. रिसर्चमधून दावा करण्यात आला आहे की, अल्कोहो बेस्ड सॅनिटायजर वापरताना जर एक थेंबही एखाद्या मुलाच्या डोळ्यात गेलं तर त्याच्या डोळ्यांची दृष्टी तो गमावून बसेल. त्यामुळे यापासून सावध रहा.
5 / 9
वैज्ञानिकांनी सांगितले की, 'अल्कोहोल बेस्ड सॅनिटायजर मार्च २०२० पासून ते आतापर्यंत मोठ्या प्रमाणात वापरलं जात आहे. खासकरून लहान मुलांनाही दिलं जात आहे'.
6 / 9
भारतीय वैज्ञानिकांचं देखील मत आहे की, सॅनिटायजरपासून लहान मुलांना दूर ठेवा. सॅनिटायजरमुळे दोन मुलांच्या डोळ्यात सॅनिटायजर गेलं आणि त्यांना भरती करावं लागलं'.
7 / 9
डॉक्टर सांगतात की, सॅनिटायजरमुळे लहान मुलांच्या डोळे खराब होण्याचा धोका असू शकतो. त्यामुळे पालकांनी लहान मुलांचे हात धुण्यासाठी साबणाचा वापर करावा. सॅनिटायजरचा वापर करू नये.
8 / 9
डेली मेलनुसार, फ्रेंच पीसीसी रिसर्च ग्रुपच्या वैज्ञानिकांनी JAMA एफथाल्मोलॉजीमध्ये प्रकाशित आपल्या रिसर्चमध्ये लिहिले आहे की, 'अल्कोहोल बेस्ड हॅंड सॅनिटायजरचा वापर मार्च २०२० पासून मोठ्या प्रमाणात होत आहे. हे कोरोना महामारीमुळे झालं'.
9 / 9
डॉक्टरांनी लिहिले की, लहान मुलांमध्ये ऑक्युलर इंज्युरी होण्याचा धोका जास्त असतो आणि हॅंड सॅनिटायजरमुळे अनेकदा डोळ्यांची दृष्टीही जाऊ शकते.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सResearchसंशोधनHealthआरोग्य