Drink water in winters : ना इम्युनिटीला धोका - ना लठ्ठपणाची भीती, हिवाळ्यात पाणी पिल्याने होतील आजार दूर!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 05:40 PM2020-10-27T17:40:45+5:302020-10-27T18:16:34+5:30

पाणी आपल्या शरीराच्या अवयवांसाठी खूप महत्वाचे आहे. मानवी शरीरात सुमारे 70 टक्के पाणी आहे. जे पेशी, अवयव आणि टीशूना रेगुलेट करण्याचे काम करते. घाम, पचन आणि लघवीमुळे शरीरात पाण्याची कमतरता होत असते. ज्यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते.

हिवाळ्यात कमी पाणी पिण्यामुळे ही समस्या अधिक वाढते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, शरीरात पुरेसे पाणी केवळ आपल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठीच चांगले नाही तर त्याचे अनेक मोठे फायदे देखील आहेत.

आरोग्य तज्ञ्जांच्या मते, उन्हाळ्यात एखाद्या व्यक्तीने दररोज किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. मात्र, हिवाळ्यात पाण्याचे एवढे प्रमाण पचवण्यास कठीण असते. यामुळे, शरीर डीहायड्रेटकरण्यास सुरूवात करते आणि आरोग्यास मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवू शकते. त्यामुळे हिवाळ्यातही आपल्याला भरपूर पाणी प्यायला पाहिजे.

हिवाळ्यात पाण्याअभावी शरीर डीहायड्रेट होते, ज्यामुळे हायपोथर्मिया सारख्या रोगाचा धोका जास्त वाढतो. शरीराचे तापमान असंतुलित झाल्यामुळे असे होते. आपल्या शरीराचे तापमान राखण्यासाठी हिवाळ्यात भरपूर पाणी प्या आणि हायपोथर्मियासारख्या आजारांपासून दूर रहा.

हिवाळा हा आपल्या प्रतिकारशक्तीसाठी एक टेस्टिंगचा कालावधी आहे. या काळात आपल्याला आजारी पडण्यास भाग पाडणारे अनेक एअरबॉर्न डिसीज (हवेतून पसरणारे रोग) होतात.

पाण्याअभावी डीहायड्रेशन आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करते, जी आपल्याला या आजारांपासून वाचवते. म्हणूनच, प्रतिकारशक्ती कायम ठेवण्यासाठी हिवाळ्यात भरपूर पाणी प्या.

हिवाळ्यात जास्त कॅलरीयुक्त आहारामुळे आपले वजन वेगाने वाढू लागते. कमी फिजिकल अॅक्टिव्हिटीमुळे शरीर सुस्त होते. ज्यामुळे शरीरात अतिरिक्त कॅलरीज् बर्न होत नाहीत. पाण्याची पर्याप्त मात्रा शरीरातील चरबी कमी करते आणि आपल्याला लठ्ठपणापासून दूर ठेवते.

शरीराला हायड्रेट ठेवण्याबरोबरच पाणी आपले शरीरही शुद्ध करते. लघवी आणि घाम माध्यमातून पाणी शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम करते आणि रक्तामध्ये आवश्यक असलेल्या पोषक आणि ऑक्सिजनची मात्रा संतुलित ठेवण्याचे कार्य करते. याद्वारे आपले मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुस आणि हृदयाची स्थिती चांगली राहते.

ब्यूटी एक्सपर्ट म्हणतात की, पाण्यामध्ये असलेले औषधी गुणधर्म आपल्या त्वचेच्या आरोग्यास चालना देण्याचे काम करतात. हिवाळ्यात चमकणार्‍या त्वचेसाठी शरीराचे हायड्रेट होणे खूप महत्वाचे आहे.

हिवाळ्यात, पाण्याअभावी तुम्हाला कोरडी त्वचा आणि ओठ फुटणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. चेहऱ्यावरील डाग, मुरुमांची समस्या देखील सुटू शकते.

पीरियड्सच्या वेदनांमुळे अनेकदा महिलांच्या सर्व कामांवर ब्रेक लागतो. हिवाळ्यात ही समस्या वाढू शकते. अशा परिस्थितीत गरम पाणी या वेदना दूर करण्यासाठी काम करते. अशावेळी कोमट पाण्याने पोटाला शेक देणे सुद्धा फायदेशीर आहे.

हिवाळ्यात जर आपल्या खोकला आणि सर्दी झाली असेल तर गरम पाणी पिणे आपल्यासाठी रामबाण औषधापेक्षा कमी नाही. गरम पाण्याने घश्याचा त्रास देखील कमी होतो. सकाळी गरम पाणी पिण्याचे अधिक फायदे आहेत.