Coronavirus : कोणत्या व्हिटॅमिन किंवा सप्लीमेंटने तुमचा कोरोनापासून बचाव होईल? वाचा एक्सपर्ट काय म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 11:50 AM2021-04-21T11:50:11+5:302021-04-21T11:59:10+5:30

Coronavirus : जगभरातील प्रत्येक क्षेत्रातील सेलिब्रिटी सांगतात की, व्हिटॅमिन सी, झिंक, ग्रीन टी, व्हिटॅमिन D किंवा इकीनेसिया खाल्ल्याने इम्यूनिटी सिस्टीम मजबूत होतं.

गेल्या दीड वर्षापासून कोरोना व्हायरस(Crornavirus) महामारी दरम्यान प्रत्येकजण हे सांगतो की, व्हिटॅमिन घ्या व्हिटॅमिन (Vitamin) घ्या. कोरोनापासून बचावासाठी व्हिटॅमिन खा. मात्र, कोरोनापासून बचाव करणाऱ्या व्हिटमिन्सबाबत जगभरातील वैज्ञानिकांमध्ये वाद आहे. वाद-विवाद होत आहे. पण असं कोणतं व्हिटॅमिन आहे जे कोरोनाचा धोका कमी करतं? चला जाणून घेऊ उत्तर...

जगभरातील प्रत्येक क्षेत्रातील सेलिब्रिटी सांगतात की, व्हिटॅमिन सी, झिंक, ग्रीन टी, व्हिटॅमिन D किंवा इकीनेसिया खाल्ल्याने इम्यूनिटी सिस्टीम मजबूत होतं. याने कोरोना व्हायरसपासून आपला बचाव होतो. पण काय अशा प्रकारचे सल्पीमेंट्स खाल्ल्याने आपला कोरोनापासून बचाव होतो का किंवा सुरक्षा मिळते का? याबाबत आतापर्यंत पूर्ण माहिती वैज्ञानिकांनी मिळालेली नाही.

गेल्यावर्षी मार्केटमध्ये सप्लीमेंट्सची मागणी वाढली होती. अमेरिकेत कोरोना व्हायरस संक्रमणाच्या पहिल्या आठवड्यातच सप्लीमेंट्सच्या मार्केटमध्ये ३५ टक्के वाढ झाली होती. हा ट्रेंड केवळ अमेरिकेपर्यंत लिमिटेड नव्हता. यूके मध्ये गेल्यावेळी लॉकडाऊनआधी व्हिटॅमिन सी च्या गोळ्यांची विक्री ११० टक्क्यांनी वाढली होती. त्यासोबतच मल्टीव्हिटॅमिन्सच्या गोळ्या ९३ टक्के जास्त विकल्या गेल्या. तर झिंकच्या गोळ्यांची विक्री ४१५ टक्के वाढली होती.

मात्र, काही वैज्ञानिक आणि हेल्थ एक्सपर्ट असं मानतात की, कोरोनापासून बचाव करण्यासाठी व्हिटॅमिन डी महत्वपूर्ण भूमिका बजावतं. पण यावरूनही जगभरात वाद आहे. NNEdPro ग्लोबल सेंटर फॉर न्यूट्रिशन अॅन्ड हेल्थचे एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर सुमंत्र रे म्हणाले की, आम्हाला माहीत आहे की, व्हिटॅमिन डी सारखे अनेक मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत जे शरीराचं इम्यून सिस्टीम मजबूत करण्यास मदत करू शकतात.

समुंत्र रे म्हणाले की, आतापर्यंत याचे काहीच पुरावे मिळाले नाही की, कोणत्याही सप्लीमेंट्सने कोणताही आजार बरा होऊ शकतो. पण BMJ Nutrition Prevention & Health जर्नलमध्ये प्रकाशित एका नव्या रिसर्चमध्ये यावर प्रकाश टाकण्यात आला आहे की, कोणते व्हिटॅमिनने तुम्हाला खरंच कोरोनापासून सुरक्षा मिळू शकते. हा रिसर्च अमेरिका, यूके, स्वीडनमध्ये ४.४५ लाखांपेक्षा जास्त लोकांवर करण्यात आला. यात जे लोक सहभाही होते ते मल्टीव्हिटॅमिन, ओमेगा-३३, प्रोबायोटिक्स किंवा व्हिटॅमिन डी घेत होते.

व्हिटॅमिन सी, झिंक, गार्लिक(लसूण) असलेल्या सप्लीमेंट्सने कोरोनापासून तुमचा बचाव होऊ शकतो याचे काही पुरावे नाहीत. यांपासून कोरोना संक्रमणाचा धोका कमी होत नाही. UK मध्ये झालेल्या रिसर्चमध्ये सहभागी लोकांपैकी ४७ टक्के लोक सतत हे सप्लीमेंट्स घेत होते. तर ५० टक्के लोकांनी सप्लींमेंट्स घेतले नाहीत. तरी सुद्धा सर्व लोकांपैकी ६ टक्के लोक कोरोना पॉझिटिव्ह निघाले.

हे सप्लीमेंट्स घेतल्यावर कोरोनापासून बचाव होणार - वैज्ञानिकांना असं आढळून आलं की, जे लोक प्रोबायोटिक्स, ओमेगा-३ फॅटी अॅसिड मल्टीव्हिटमिन्स किंवा व्हिटॅमिन डी सप्लीमेंट्स घेतले त्यांना कोरोना संक्रमणाचा धोका कमी होतो. प्रोबायोटिक्स घेतल्यावर कोरोना संक्रमणाचा धोका १४ टक्के कमी होतो. ओमेगा ३ फॅटी अॅसिड घेतल्यावर १२ टक्के, मल्टीव्हिटॅमिन्स घेतल्यावर १३ टक्के आणि व्हिटॅमिन डी सप्लीमेंट घेतल्यावर कोरोना संक्रमणाचा धोका ९ टक्के कमी होतो.

या रिसर्चनुसार, अशाप्रकारचे सप्लीमेंट्स घेतल्याचा सर्वात जास्त फायदा महिलांना झाला. या सप्लीमेंट्सच्या सेवनाने पुरूषांना कोणताही फरक पडला नाही. वैज्ञानिक असंही म्हणाले की, व्हिटॅमिन सी, झिंक किंवा गार्लिक असलेले सप्लीमेंट्सने तुमचा कोरोनापासून बचाव होत नाही.

अमेरिका आणि स्वीडनमधूनही असेच निष्कर्ष समोर आले आहेत. तिथेही ज्या लोकांनी प्रोबायोटिक्स, ओमेगा-३ फॅटी अॅसिड, मल्टीव्हिटॅमिन्स किंवा व्हिटॅमिन डी चे सप्लीमेंट्स घेतले त्यांना कोरोना संक्रमणाचा धोका कमी आहे. असं असलं तरी WHO नुसार, कोरोना संक्रमणापासून बचावासाठी या सप्लीमेंट्सबाबत काहीच गाइडलाइन नाहीये.

या रिसर्चमधील खास बाब ही आहे की, यात सहभागी लोकांकडून उत्तरे एका अॅप द्वारे मागितली होती. त्या आधारावर या रिसर्चचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. त्यामुळे वर दिलेले व्हिटॅमिन्स तुम्ही घेत राहिले पाहिजे. सोबतच कोरोनापासून बचावासाठी डबल मास्क, सहा फूट अंतर, सॅनिटायझेशन या गोष्टीही करत रहा.