Coronavirus : कोरोनाग्रस्त रूग्णाच्या मागे चालल्यानेही धोका, वाचा व्हायरसची मजबूत पकड कुठपर्यंत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 15:20 IST2020-04-11T15:00:55+5:302020-04-11T15:20:33+5:30
Coronavirus : खोकल्याने किंवा शिंकल्याने बाहेर आलेले मायक्रोस्कोपिक ड्रॉपलेट्स साधारण 3 तास हवेत आपला प्रभाव दाखवू शकतात.

कोरोना व्हायरस ड्रॉपलेटच्या माध्यमातून संक्रमित व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतो. त्यामुळे खोकताना किंवा शिंकताना तोंडावर हात ठेवण्याचा किंवा मास्क घालण्याचा सल्ला दिला जातो.

आता एका नव्या रिसर्चमधून समोर आले आहे की, हा व्हायरस संक्रमित व्यक्तीच्या मागे चालणाऱ्या किंवा धावणाऱ्या व्यक्तीलाही सहजपणे आपल्या जाळ्यात घेऊ शकतो. असा दावा आमचा नाही तर एका रिसर्चमध्ये करण्यात आलाय.

नेदरलॅंडच्या एका युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक बर्ट ब्लोकन आणि फॅबियो मेलिजिया यांनी सिम्युलेशन टेक्निकच्या माध्यमातून हे समजावून सांगितले की, कशाप्रकारे हा व्हायरस अंतर ठेवल्यावरही व्यक्तीला शिकार करतो.

टेक्नॉलॉजीनुसार, कोरोना व्हायरसची लागण झालेल्या एखाद्या व्यक्तीच्या मागे तुम्ही 6 फूटाचं अंतर ठेवून चालत असाल किंवा धावत असाल तर तुम्हाला संक्रमण होण्याचा धोका अधिक असतो.

रिपोर्टनुसार, कोरोना संक्रमित व्यक्तीच्या मागे चालणे किंवा धावणेही धोकादायक आहे. कोरोना व्हायरसचे ड्रॉपलेट्स 6 फूटापेक्षा जास्त अंतरावरही आपला प्रभाव दाखवू शकतात.

त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या मागे धावण्यापेक्षा किंवा चालण्यापेक्षा बाजूने चालावे. नाही तर दोघांमधील अंतर 6 फूटांपेक्षा जास्त असावं.

हा रिसर्च न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकशित करण्यात आला आहे. यात दावा करण्यात आला आहे की, कोरोना व्हायरस सरफेससोबतच हवेतही काही तास सक्रिय राहू शकतो.

वैज्ञानिकांनी सांगितले की, खोकल्याने किंवा शिंकल्याने बाहेर आलेले मायक्रोस्कोपिक ड्रॉपलेट्स साधारण 3 तास हवेत आपला प्रभाव दाखवू शकतात.

पण हवेत असलेले अर्ध्यापेक्षा अधिक व्हायरस पार्टिकल्स साधारण 66 मिनिटात निष्क्रिय होतात. तेच व्हायरसचे साधारण 25 टक्के पार्टिकल्स साधारण एक तास अॅक्टिव राहतील.

तिसऱ्या तासात यांची संख्या कमी होऊन 12.50 टक्के इतकी राहिल. कोरोना व्हायरस तांब्याच्या वस्तूवर कमी सक्रिय राहतो. साधारण 46 मिनिटात तांब्यावर याचा अर्ध्यापेक्षा जास्त प्रभाव कमी होतो.

















