Coronavirus : भारतात बनत असलेल्या वॅक्सीनबाबत नवा खुलासा, केवळ 2 डोजने मिळेल मजबूत इम्यूनिटी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 01:27 PM2020-06-24T13:27:16+5:302020-06-24T13:58:40+5:30

ब्रिटीश कंपनी एस्ट्राजेनकाच्या माध्यमातून कोरोना व्हायरस वॅक्सीनचं उत्पादन भारतात सुरू करण्यात आलं आहे.

सध्या जगभरात कोरोना व्हायरसच्या वॅक्सीनवर रिसर्च सुरू आहे. काही वॅक्सीनच्या टेस्ट शेवटच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. ऑक्सफोर्डच्या वॅक्सीनबाबत एक चांगली माहिती समोर आली आहे.

ब्रिटीश कंपनी एस्ट्राजेनकाच्या माध्यमातून कोरोना व्हायरस वॅक्सीनचं उत्पादन भारतात सुरू करण्यात आलं आहे.

ऑक्सफोर्डच्या या वॅक्सीनबाबत समोर आले आहे की, या वॅक्सीनचे केवळ 2 डोज घेतले तर याने इम्यूनिटी खूप जास्त चांगली डेव्हलप होते.

वैज्ञानिकांचं असं मत आहे की, एमएमआर वॅक्सीन प्रमाणेच ऑक्सफोर्डच्या कोरोना वॅक्सीन AZD1222 चे दोन डोज देण्याची गरज पडू शकते.

डुकरांवर करण्यात आलेल्या ट्रायल दरम्यान याची माहिती मिळाली की, बूस्टर डोजने मजबूत इम्यूनिटी तयार होते. ही वॅक्सीन आधीच ट्रायल दरम्यान मनुष्यांना देण्यात आली आहे आणि याचे सकारात्मक रिजल्ट समोर आले आहेत.

ऑक्सफोर्डच्याच काही वैज्ञानिकांनी अंदाज व्यक्त केला आहे की, ऑक्टोबरपर्यंत ही वॅक्सीन तयार होऊ शकते. कोरोनाच्या AZD1222 वॅक्सीनला इतर वॅक्सीन कॅंडिडेटपेक्षा वेगळं मानलं जात आहे.

भारतासहीत आणखी काही देशांमध्ये याचं आधीच उत्पादन सुरू झालं आहे.

वैज्ञानिक आणि सरकारी एजन्सीकडून AZD1222 ला मंजूरी मिळाली तर ही वॅक्सीन सर्वसामान्य लोकांना उपलब्ध होईल. काही देशांमध्ये या वॅक्सीनची निर्मिती मोठ्या प्रमाणात केली जात आहे.

तेच ब्रिटन सरकारने सांगितले की, कोरोनाची वॅक्सीन तयार होताच, सरकारी आरोग्य कर्मचारी, सोशल केअर वर्कर्स, 50 वयापेक्षा अधिक वयाचे लोक आणि हार्ट-किडनी रूग्णांना प्राथमिकतेच्या आधारावर ही वॅक्सीन मिळेल.

एस्ट्राजेनका कंपनीचे सीईओ म्हणाले की, 10 हजार लोकांवर या वॅक्सीनची ट्रायल केली जात आहे. ते म्हणाले की, या वॅक्सीनने लोकांना कमीत कमी एक वर्षासाठी इम्यूनिटी मिळेल.

Read in English