CoronaVirus News : कोरोना विषाणूंशी लढण्याासाठी मानवी शरीर कधीपर्यंत तयार होणार? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 10:12 AM2020-05-08T10:12:42+5:302020-05-08T10:25:26+5:30

कोरोना व्हायरसचा प्रसार दिवसेंदिवस जगभरात वाढत चालला आहे. जगभरातील शास्त्रज्ञ कोरोना व्हायरसवर लस शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कोरोनावर आतापर्यंत कोणतंही औषध किंवा लसेचा शोध लागलेला नाही. व्हायरसच्या इन्फेक्शनमधून बऱ्या झालेल्या व्यक्तीला काम करण्याची परवानगी देण्याआधी त्या रुग्णाची पीसीआर टेस्ट केली जाते.

व्हायरस शरीरात जीवंत आहे की नाही हे टेस्टमधून दिसून येतं. प्रोफेसर इवासकी यांनी दिलेल्या माहितीनुसार तब्बल ३० टक्के लोकांच्या शरीरात कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या अँटीबॉडी तयार होत नाहीत.

अँटीबॉडी एक प्रोटीन आहे. जे आपल्या शरीरात संक्रमण झाल्यानंतर तयार होत असतं. शरीरातील व्हायरस आणि बॅक्टेरियांना संपवण्याची क्षमता अँटीबॉडीजमध्ये असते. कोणतंही संक्रमण झाल्यानंतर शरीरात अँटीबॉडी तसेच राहतात. त्यामुळे व्हायरसचं किंवा बॅक्टेरियांचे पुन्हा संक्रमण झाल्यानंतर त्यांना रोखता येऊ शकतं.

पण कोरोना व्हायरसचं संक्रमण झाल्यानंतरही शरीर कशाप्रकारे शरीर प्रतिसाद देईल याबाबत शास्त्रज्ञ साशंक आहेत. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही व्हायसरचं संक्रमण पसरल्यानंतर त्या व्यक्तीच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती व्हायरसशी लढत असते. रोगप्रतिकारकशक्ती प्रत्येक व्यक्तीमध्ये एकसमान नसून अनुवांशिकतेवर निर्धारित असू शकते.

शरीरात दोन प्रकारचे सेल्स असतात. टी सेल्स आणि बी सेल्स या सेल्सद्वारे विषाणूंशी लढण्याासाठी अँटीबॉडीज तयार केल्या जातात. अमेरिकेतील येल यूनिवर्सिटीचे प्रोफेसर एइकिको इवासाकी यांनी सांगितले की, टी सेल्स शरीरातील ज्या पेशींवर व्हायरसचं संक्रमण झालं आहे अशा पेशींना नष्ट करतात.

पहिल्यांदा व्हायरसचं संक्रमण झाल्यानंतर आजारातून बंर व्हायला वेळ लागतो. पण पुन्हा संक्रमण झाल्यानंतर व्यक्तीचे शरीर व्हायरसशी लढण्यासाठी तयार असतं. कारण अँटीबॉडीज तयार झालेले असतात. पण कोरोना व्हायरसच्या बाबतीत असं होईल असं नाही.

कारण आत्तापर्यंत कोरोना व्हायरसवर झालेल्या रिसर्चमधून दिसून आलं की एकदा संक्रमण झालेल्या व्यक्तीला पुन्हा कोरोनाची लागण झाल्यास ती व्यक्ती पुन्हा कोरोना संक्रमित होऊ शकते. हा रिसर्च सुरूवातीला उंदरांवर आणि माकडांवर करण्यात आला होता.

चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या संक्रमणांतून बाहेर आलेल्या तीस टक्के लोकांमध्ये एंटीबॉडी दिसून आले आहेत. म्हणजेच हे लोक व्हायरसशी लढत असलेल्या अँटीबॉडी प्रोटीन विकसीत करत न करताच ते बरे झाले आहेत. प्लाज्मा थेरेपीचा वापर करून कोरोना रुग्णांचे उपचार केले जाऊ शकतात.

त्यासाठी कोरोनातून ठीक झालेल्या रुग्णांच्या शरीरातून रक्त काढून त्यात अँटीबॉडीचे सीरम वेगवेगळं करून इतरांच्या शरीराला पुरवावी लागते. असं इवासाकी यांनी सांगितले. व्हायरस पसरल्यानंतर लोकांमध्ये व्हायरसशी लढण्याची क्षमता विकसीत झालेली असते. पण कोरोनाच्या संक्रमणाबाबत असं होण्यासाठी बराच वेळ लागू शकतो.