Coronavirus : 'ज्या' गोष्टीमुळे दिलासा मिळण्याची होती सर्वात जास्त आशा, त्यासंबंधी निराशाजनक माहिती आली समोर!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 03:02 PM2020-05-23T15:02:11+5:302020-05-23T15:25:20+5:30

काही देशांमध्ये तर कोरोनातून बऱ्या होणाऱ्या लोकांना इम्यूनिटी पासपोर्ट देण्याची तयारी सुरू केली आहे. आता एक निराश करणारा रिसर्च समोर आला आहे.

कोरोनाबाबत जगभरात हेच मानलं जात आहे की, जे लोक यातून एकदा बरे होतील त्यांची इम्यूनिटी डेव्हलप होईल. पण कोरोना व्हायरस हा पूर्णपणे नवीन असून याबाबत पुरेशा रिसर्चचा अभाव आहे. वेगवेगळे रिसर्च रोज समोर येत आहेत. दरम्यान नेहमीच तज्ज्ञ लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला देत आहेत.

काही देशांमध्ये तर कोरोनातून बऱ्या होणाऱ्या लोकांना इम्यूनिटी पासपोर्ट देण्याची तयारी सुरू केली आहे. आता एक निराश करणारा रिसर्च समोर आला आहे.

tasnimnews.com च्या रिपोर्टनुसार, यूनिव्हर्सिटी ऑफ एम्स्टर्डॅममधील वैज्ञानिकांनी कोरोना व्हायरस फॅमिलीतील व्हायरसबाबत 10 लोकांची बराच काळ तपासणी केली. चार वेगवेगळे कोरोना व्हायरस घेऊन 35 वर्षांपर्यंत 10 लोकांवर अभ्यास करण्यात आला होता. (या लिंकवर संपूर्ण डिटेल्स वाचू शकता - https://www.tasnimnews.com/en/news/2020/05/23/2271834/immunity-to-coronavirus-could-only-last-six-months-study)

या रिसर्चमधून समोर आले की, कोरोना व्हायरस फॅमिलीने संक्रमित होणारे लोक संभावत: केवळ 6 महिन्यांपर्यंत इम्यून राहतात. त्यानंतर जगभरातील इम्यूनिटी पासपोर्ट स्कीमवर प्रश्न उपस्थित होऊ शकतील.

अनेक देश ही तयारी करत आहेत की, जे लोक कोरोनातून बरे झाले त्यांना इम्यूनिटी पासपोर्ट देऊन कामावर पाठवले जाईल आणि त्यांना सोशल डिस्टंसिंग करण्याची गरज पडणार नाही.

रिपोर्टनुसार, कोरोना व्हायरस फॅमिलीच्या 4 व्हायरसमधून (यात Covid -19 नाही) कॉमन कोल्ड निर्माण होतं. रिसर्चमधून समोर आले आहे की, याने लोकांच्या शरीरात फार कमी काळासाठी इम्यूनिटी निर्माण होते. म्हणजे त्यांची इम्यूनिटी जास्त काळ टिकणार नाही.

यूनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांचं मत आहे की, 12 महिन्यांनंतर हे बघण्यात आले की, बरे झालेले लोक कोरोना फॅमिली व्हायरसने पुन्हा संक्रमित झालेत.

Covid-19 हा कोरोना व्हायरस फॅमिलीतील नवीन व्हायरस आहे. या व्हायरसने सध्या जगभरात थैमान घातलं आहे. अशात कोरोना फॅमिलीच्या इतर व्हायरसवर करण्यात आलेला हा रिसर्च Covid-19 ला समजून घेण्यासाठी महत्वाचा ठरू शकतो.

ब्रिटनचे आरोग्य मंत्री मॅट हॅनकॉक म्हणाले होते की, सरकारने एक कोटी अॅंटीबॉडी टेस्ट किटसाठी करार केला आहे. तसेच ते 'सिस्टम ऑफ सर्टिफिकेशन' (इम्यूनिटी पासपोर्ट देण्यासारखी स्कीम) वर नजर देऊन आहेत.

याने त्या लोकांना ओळखता येईल जे काम करण्यासाठी योग्य आहेत. पण हेही म्हणाले होते की, लोक कोरोनातून कसे इम्यून होतात, याबाबत अजून सायंटिफिक पुरावे येत आहेत.

यूनिव्हर्सिटीचं मत आहे की, हे माहीत करून घेण्यासाठी की, कोण संक्रमित झाले आहेत, त्यासाठी अॅंटीबॉडी टेस्टचा लिमिटेडच वापर होईल. या रिसर्चमध्ये सहभागी प्राध्यापक लिआ वॅन डेर होएक म्हणाले की, वॅक्सीनेशननंतरही हर्ड इम्यूनिटी हा एक मुद्दा राहील. होऊ शकतं की, लोक सहा महिने किंवा 1 वर्षांनी पुन्हा संक्रमित होतील.