शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : आता डिव्हाइस हवेत शोधणार कोरोना, पुढील महिन्यात येणार बाजारात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2020 10:21 AM

1 / 11
जगभरात कोरोनाचा हाहाकार माजला आहे. आतापर्यंत जगात 33,867,247 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर अनेकांचा मृत्यू झाला आहे. भारतात सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.
2 / 11
दरम्यान, कोरोना व्हायरस हवेतून पसरतो का? याबाबत अद्याप काही स्पष्ट झाले नाही. मात्र, आता कोरोना व्हायरस हवेत आहे की नाही, हे येत्या काही दिवसांत शोधणे सोपे होणार आहे.
3 / 11
कॅनडाच्या एका कंपनीने असा दावा केला आहे की, त्यांनी गेम चेंजिंग डिव्हाइस तयार केले आहे. हे डिव्हाईस हवेतील कोरोना व्हायरचा शोध घेण्यास मदत करू शकणार आहे.
4 / 11
कंट्रोल एनर्जी कॉर्प (Kontrol Energy Corp) नावाची कंपनी आधीपासूनच घरातील हवेची गुणवत्ता आणि देखरेखीची साधने बनविण्यामध्ये गुंतलेली आहे.
5 / 11
कोरोना व्हायरसची महामारी सुरू झाल्यानंतर, कंपनीने कोरोना व्हायरस डिटेक्शन डिव्हाइस डिझाइन करण्याचे काम सुरू केले होते.
6 / 11
कॅनडाच्या ओंटारियो येथे दोन प्रयोगशाळांमध्ये कोरोना व्हायरसवर संशोधन केल्यानंतर कंपनीने बायोक्लॉड (BioCloud) नावाचे एक डिल्हाइस तयार केले.
7 / 11
बायोक्लॉड डिव्हाइस हँड ड्रायरसारखे दिसते. परंतु हे डिव्हाइस हवा आत ओढते आणि नंतर त्या हवेचे विश्लेषण कोरोना तपासणीसाठी करते.
8 / 11
globalnews.ca च्या वृत्तानुसार, कंपनीचे म्हणणे आहे की, बायोक्लॉड डिव्हाइस एखाद्या विशिष्ट ठिकाणी हवेत व्हायरस आहे की नाही, ते शोधणार आहे.
9 / 11
जर, बायोक्लॉड डिव्हाइस रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळला तर त्याठिकाणी राहणाऱ्या लोकांची स्वतंत्रपणे तपासणी करता येईल. हे डिव्हाइस क्लासरुम किंवा कार्यालयात देखील उपयुक्त ठरू शकते.
10 / 11
कॅनडामधील वेस्टर्न युनिव्हर्सिटीमधील मायक्रोबायोलॉजीचे प्राध्यापक डेव्हिड हेनरिक्स यांनी बायोक्लॉड डिव्हाइसची चाचणी केली आहे. कंपनी हे डिव्हाइस नोव्हेंबरपर्यंत बाजारात आणणार आहे. याची किंमत सुमारे ८.८ लाख रुपये असण्याची शक्यता आहे.
11 / 11
दरम्यान, बायोक्लॉड डिव्हाइससाठी कंपनीला जगभरातून ऑर्डर मिळण्यासही सुरुवात झाली आहे. सध्या कंपनी दरमहा २० हजार युनिट्सची निर्मिती करू शकते.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCanadaकॅनडा