धक्कादायक! चीनकडे होता जगातील सर्वात विध्वंसक 'टाईम बॉम्ब,' तज्ज्ञांचा अंदाज ठरला खरा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 01:41 PM2020-06-16T13:41:23+5:302020-06-16T14:05:07+5:30

अनेकदा सुरक्षेच्या बाबतीत सुचना दिल्या जातात परंतु त्यावर कोणत्याही प्रकराची अंमलबजावणी केली जात नाही. घटना घटल्यानंतर सगळ्याची नजर त्या गोष्टीकडे जाते. तुमचा विश्वास बसणार नाही पण कोरोना विषाणूच्या बाबतीत सुद्धा असाच प्रकार घडला आहे.

द अटलांटिकमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार क्लिनिकल माइक्रोबायोलॉजी रिव्यूजमध्ये २००७ मध्येच कोरोना विषाणूंबाबत धोक्याची सुचना देण्यात आली होती. या अहवालात तज्ज्ञांनी जगाभरातील लोकांसाठी चीनमध्ये टाईम बॉम्ब असल्याचे स्पष्ट केले होते.

Clinical Microbiology Reviews मध्ये तेरा वर्षांपूर्वी ही माहिती प्रकाशित करण्यात आली होती. चीनमध्ये वटवाघळांमध्ये SARS-CoV सारखे व्हायरस मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. दक्षिण चीनमध्ये या प्राण्यांना खाण्याची परंपरा आहे. त्यामुळे हा घातक टाईमबॉम्ब आहे.

तज्ज्ञांनी SARS-CoV विषाणूंला टाईम बॉम्ब म्हटलं होतं. रिपोर्ट प्रकाशित होण्याच्या ५ वर्षांपूर्वी या व्हायरसने हाहाकार पसरवला होता. २००२ मध्येही या व्हायरसमुळे माहामारी पसरली होती. या माहामारीमुळे जगभरात ८०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता.

याच कारणामुळे सध्या जगभरात कोरोनाची माहामारी पसरली आहे. २००७ मध्ये क्लिनिकल माइक्रोबायोलॉजी रिव्यूजमध्ये छापण्यात आलेल्या माहितीत तज्ज्ञांनी कोरोना व्हायरसबाबत धोक्याची सुचना दिला होती.

अमेरिकेतील युनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाचे वायरोलॉजिस्ट माइकल बुचमीर हे १९८० पासूनच कोरोना विषाणूंवर संशोधन करत आहेत. जीवघेण्या कोरोना विषाणूंच्या प्रसाराबाबत आधीपासूनच मला शंका होती, असे मत त्यांनी व्यक्त केले. पण संशोधनासाठी लागत असलेल्या आर्थिक घटकांची कमतरता होती. याशिवाय इतर तज्ज्ञ कोरोना विषाणूंमुळे मोठ्या प्रमाणात लोकसंख्येला धोका पोहोचू शकतो हे मान्य करण्यास तयार नव्हते.

अमेरिकेतील एरिजोना स्टेट युनिव्हरर्सिटीचे वायरोलॉजिस्ट ब्रेंडा होग यांनी आपले संपूर्ण जीवन विषाणूंबाबत रिसर्च करण्यासाठी समर्पित केले.

ब्रेंडा यांनी दिलेल्या माहितीनुसार २००२ मध्ये सार्सची माहामारी पसरल्यानंतर त्यांन कोरोनाची लस तयार करण्यावर काम सुरू केले होते. पण २००८ मध्ये आर्थिक घटकांच्या कमतरतेमुळे त्यांना हे काम थांबवावं लागलं.

(Image credit : scientist magazine)