कोरोना लसीबाबत तुमच्याही मनात असू शकतात हे १० गैरसमज; वेळीच जाणून घ्या सत्य

By manali.bagul | Published: December 18, 2020 11:23 AM2020-12-18T11:23:59+5:302020-12-18T11:39:41+5:30

जगातील काही भागात कोरोनाची लस सर्वसामान्यांना उपलब्ध होऊ लागली आहे. अनेक देशात लसीकरण मोहिमेची तयारीही सुरू आहे. तीन कंपन्यांनी आपत्कालीन लसीला मान्यता देण्यासाठी अर्ज केला आहे. यापैकी फायझरच्या लसीचे डोस अमेरिकेसह अनेक देशांमध्ये दिले जात आहेत. कोरोनाच्या लसीबाबत अनेक गैरसमज लोकांच्या मनात आहेत. आज आम्ही तुम्हाला गैरसमज दूर करण्यासाठी महत्वाच्या असलेल्या गोष्टींबाबत सांगणार आहोत.

लसीमुळे कोरोना होईल- बहुतेक कोविड लसींमध्ये संपूर्ण व्हायरस नसतो, परंतु त्यातील केवळ एक भाग असतो. लसीकरणानंतर ताप आणि इतर सौम्य दुष्परिणाम आपल्या रोगप्रतिकारक शक्तीच्या प्रतिसादामुळे उद्भवतात. काही लसींमध्ये निश्चितपणे जिवंत कोविड व्हायरस वापरला आहे, त्यापैकी दोन भारतात तयार केले गेले आहेत परंतु 'कमकुवत' किंवा निष्क्रिय व्हायरस आपल्याला आजारी बनवत नाहीत. गोवर, टीबी सारख्या आजारांसाठी आपण यापूर्वीच लस घेतलेली आहे.

लस घेतल्यानंतर मास्क लावावा लागणार नाही- लस प्रतिकारशक्ती विकसित करेल आणि व्हायरचा प्रसार थांबवेल. असं अजिबात नाही. त्यासाठी काही महिने लागू शकतात. प्रतिकारशक्ती किती काळ टिकेल आणि ज्यांना लसी दिली गेली आहे ते आजारी पडल्यानंतर इतरांना संसर्ग देऊ शकतात किंवा नाही हेदेखील आपल्याला माहिती नाही. म्हणून मास्कचा वापर करायलाच हवा.

डिएनएवर परिणाम होईल- फायझर आणि मॉडर्नाची नवीन लस एमआरएनएवर आधारित आहे, याचा अर्थ असा नाही की ते आपल्या डीएनएसाठी एडिटिंग टूलमधून साधनं म्हणून काम करतील. एमआरएनए आपल्या पेशींना एंटीबॉडी तयार करण्यास निर्देशित करते परंतु मध्यवर्ती भागात प्रवेश करत नाही. डीएनए न्यूक्लियसमध्ये राहतात.

लसीने आयुष्यभर सुरक्षा मिळणार - लसीकरणानंतर एखाद्या आजाराविरुद्ध लढण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढते. पण व्हायरसच्या संक्रमणाविरुद्ध किती वर्षांपर्यंत सुरक्षा देऊ शकते. याबाबत अजूनही माहिती मिळालेली नाही. म्हणून एकदा लस घेतल्यानंतर आयुष्यभर सुरक्षा मिळेल असं म्हणणं चुकीचं ठरेल.

लसीचे एक डोस पुरेसा आहे - बहुतेक लसीचे दोन डोस आवश्यक असतात. डोस किती प्रतिकारशक्ती देतात याबद्दल तज्ञांना अद्याप माहिती नाही, ते दोन्ही डोस सुचवित आहेत. एकापेक्षा दोन लसीचे डोस उत्तम ठरतात.

लसीचे साईड इफेक्ट्स कोरोनापेक्षाही भयंकर - सोशल मीडियावर बर्‍याच पोस्टवर या लसीबाबत अयोग्य दावे केले जात आहेत. एका दाव्यामध्ये लसीता मृत्यू दर व्हायरसपेक्षा जास्त असल्याचे म्हटले जाते. आणखी एक पोस्ट दावा करते की बिल गेट्सने असे म्हटले आहे की लसीमुळे ७ लाख लोक मरू शकतात. हे दोन्ही दावे सरासरी खोटे आहेत. गेट्स म्हणाले की, ७ लाख लोकांना दुष्परिणाम होऊ शकतात. लस दिल्याने होणारे ताप आणि वेदना हे खूप सामान्य दुष्परिणाम आहेत आणि यामुळे दीर्घकाळ हानी होत नाही.

लसीमध्ये चीप असणार - काही महिन्यांपूर्वी एका अमेरिकन कंपनीने कोविड लसीसाठी भरलेल्या सिरिंज तयार केल्याचे सांगितले. ज्याच्या लेबल्सवर आरएफआयडी टॅग असतील जेणेकरुन त्यांचा मागोवा घेतला जाऊ शकेल. म्हणजेच, चिप बॉक्सवर राहते. असं असलं तरी, इंजेक्शनद्वारे लोकांमध्ये मायक्रोचिप्स ठेवता येत नाहीत कारण त्यांचा आकार मोठा आहे.

लसीमुळे वंधत्वासह गंभीर परिणाम होतात- सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही पोस्टमध्ये असा बनावट दावा केला जात आहे. वंध्यत्व किंवा इतर गंभीर दुष्परिणामांकरिता लस जबाबदार आहे या दाव्यासाठी तथ्य तपासकांना कोणताही आधार सापडला नाही.

पहिली लस दिल्यानंतर महिलेला पैसे देण्यात आले- युकेमध्ये राहत असलेल्या ९० वर्षीय महिला एटान यांना कोविड लसीचे पहिले इंजेक्शन देण्यात आले. बरेच लोक त्याला 'क्राइसिस एक्टर' म्हणून संबोधतात. म्हणजेच ज्याला लसीचा प्रसार करण्यासाठी पैसा मिळाला आहे. 2008 मध्ये या महिलेचा मृत्यू झाल्याची अफवा देखील होती पण तो दावाही बनावट ठरला.