Corona Patient Care: कोरोना झाल्यास लवकर बरं होण्यासाठी घरीच कशी घ्याल काळजी?; वाचा काय खायचं काय नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 12:09 PM2021-04-16T12:09:12+5:302021-04-16T16:48:42+5:30

Corona Patient Care : होम आयसोलेशनसाठी कोरोना रुग्णांच्या घरी वेगळी आणि हवेशीर खोली असणं गरजेचं आहे. रुग्णासाठी वेगळं टॉयलेट असल्यास उत्तम ठरेल.

कोरोना व्हायरसची दुसरी लाट खूपच जीवघेणी असल्याचं दिसून येत आहे. आधीपेक्षा वेगानं संक्रमण पसरत आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांना रुग्णालयात दाखल केलं जात आहे. पण सौम्य लक्षणं असलेले कोरोना पॉझिटिव्ह लोक घरी राहूनही स्वतःची व्यवस्थित काळजी घेऊन लवकर बरे होऊ शकतात. याला होम आयसोलेशन असंसुद्धा म्हटलं जात. होम आयसोलेशनमध्ये रुग्ण घरच्या इतर सदस्यांपासून वेगळं राहून ट्रिटमेंट घेतात. आज आम्ही तुम्हाला घरी राहून आजारातून कसं मुक्त होता येईल याबाबत सांगणार आहोत. मायो क्लिनिक या वेबसाईट्वर याबाबत अधिक माहिती नमुद करण्यात आली आहे.

होम आयसोलेशनसाठी कोरोना रुग्णांच्या घरी वेगळी आणि हवेशीर खोली असणं गरजेचं आहे. रुग्णासाठी वेगळं टॉयलेट असल्यास उत्तम ठरेल. रुग्णाची काळजी घेण्यासाठी २४ तास कोणीतरी उपलब्ध असायला हवे. लक्षात घ्या की, रुग्णांची लक्षणं सौम्य दिसत असतील तर हरकत नाही. पण गंभीर लक्षणं असल्यास त्वरीत रुग्णालयात दाखल करायला हवं.

रुग्णानं आपल्या खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवायला हवेत. रुग्णांनी तीन लेअर्सचा मास्क लावायला हवा. दर ६ ते ८ तासांनी मास्क बदलायला हवा. साबण आणि पाण्यानं ४० सेकेंदापर्यंत हात धुवायला हवेत. वारंवार स्पर्श होत असलेल्या जागेच्या संपर्कापासून लांब राहायला हवं. आपली भांडी, टॉवेल, चादर वेगळं ठेवायला हवं.

घरात राहून आपला ताप, ऑक्सिजनची पातळी वारंवार तपासत राहायला हवी. शरीराचे तापमान १०० फॉरेनहाईटपेक्षा जास्त नसावे. वारंवार पाणी पित राहणं उत्तम ठरेल. जर तुम्हाला इतर कोणतेही आजार असतील तर त्याच्याही गोळ्या वेळेवर घ्यायला हव्यात. मादक पदार्थांचे सेवन टाळायला हवं. डॉक्टरांच्या सल्ल्यानं नियमित औषध घ्यायला हवीत.

कोरोना रुग्णांनी मैदा, तळलेले पदार्थ, जंक फूड खाऊ नये, चिप्स, कोल्ड ड्रिंक, चीझ, मटन, प्रोसेस्ड मीट, पाल्म ऑईल, यांसारखे अनसॅच्यूरेडेट फॅट्स असलेल्या पदार्थापासून लांब राहायला हवं. शक्यतो नॉन व्हेजपासून लांबच राहायला हवं.

कोरोना रुग्णांनी घरात तयार केलेलं साधं जेवण घ्यायला हवं. संत्री, मोसंबी, बिया, डाळी अशा प्रोटिन्सयुक्त पदार्थांचे सेवन करायला हवे. डाळी, लसूण, हळद, मसाल्याचा आहारात समावेश असायला हवं. दिवसातून ८ ते १० ग्लास पाणी प्यायला हवं. कमी फॅट्सवाले पदार्थ, दूध, दही, यांचे सेवन करायला हवे. कोरोना रुग्णांनी कमी कॉलेस्ट्रॉल असलेल्या कमी तेलातील अन्न खायला हवं.

साधारणपणे होम आयसोलेशनचा कालावधी १४ दिवासांच असतो. पण रुग्णाला १० दिवसांच्या आत ताप यांसह इतर लक्षणं दिसली नाही तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन आयसोलेशन संपवता येऊ शकतं.

कोरोना व्हायरस शरीरासोबतच मानसिक स्थिती कमजोर करण्यासही कारणीभूत ठरत असतो. म्हणून आयसोलेशनमध्ये असताना व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून तुम्ही लोकांच्या संपर्कात राहू शकता. आपल्याला आवडत असलेली पुस्तकं वाचा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप आराम करा.

होम आयसोलेशनमध्ये असताना तापाव्यतिरिक्त श्वास घ्यायला त्रास झाला, मानसिक भ्रम किंवा ओठ काळे, निळे पडत असतील त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. शौचालयाला जाण्याआधी आणि नंतर हात स्वच्छ धुवा.

रुग्णाची खोली, बाथरूम, शोचालय अशा जागा स्वच्छ करायला हव्यात. डिस्पोजेबल ग्लोव्हज घालून रुग्णाला जेवण द्यायला हवं.

(Image Credit- Getty images)

Read in English