शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Breast Cancer: पुरूषांच्या त्वचेवर असं काही दिसेल तर असू शकतो ब्रेस्ट कॅन्सर, अजिबात करून नका दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 5:33 PM

1 / 6
ब्रेस्ट कॅन्सर (Breast Cancer) एक असा आजार आहे ज्याचा सामना जगभरातील हजारो लोकांना करावा लागतो. चिंतेची बाब म्हणजे या आजाराची लक्षणं शरीराच्या बाहेर लवकर दिसत नाहीत. ज्यामुळे वेळीच उपचार न सुरू केल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागतो.
2 / 6
अनेकांना असंच वाटतं की, हा आजार केवळ महिलांना होतो. पण असं नाहीये. हा जीवघेणा आजार महिलांसोबतच पुरूषांना देखील होतो. फक्त पुरूषांमध्ये याचं प्रमाण कमी असतं. हा आजार जास्त करून महिलांमध्ये दिसतो.
3 / 6
'द सन'च्या एका रिपोर्टनुसार, भारतात ६५ वर्षीय एका पुरूषात ब्रेस्ट कॅन्सर (Breast Cancer in Male) ची एक अजब केस समोर आली आहे. सामान्यपणे ब्रेस्ट कॅन्सर शरीराच्या आतच वाढतो. बाहेर त्याचा पत्ताही लागत नाही. पण एका भारतीय पुरूषात शरीराच्या बाहेर पहिल्यांदाच लक्षण दिसलं आहे. ज्याला गंभीर मानलं जात आहे. जर तुम्हालाही हे लक्षण दिसलं तर वेळीच टेस्ट करावी.
4 / 6
रिपोर्टनुसार, झज्जरमध्ये डिटेक्ट झालेल्या पीडित पुरूषाच्या छातीच्या डावा भागातील त्वचा हळूहळू कठोर होत चालली आहे. पीडितनुसार, त्याच्यासोबत हे सगळं ७ महिन्यांपूर्वी सुरू झालं होतं. जे आता हळूहळू वाढत आहे. मात्र, त्वचा कठोर होत असूनही त्याला त्रास होत नाही. इतकंच नाही तर त्याच्या त्वचेवर जळाल्यासारखे निशाणही तयार होत आहेत.
5 / 6
डॉक्टरांनी जेव्हा रूग्णाची टेस्ट केली तेव्हा त्यांना त्याच्या त्वचेत Erythematous दिसले होते म्हणजे टिश्यूज सुकून कठोर झाले होते. जो कॅन्सरचा संकेत होता. हे कठोर टिश्यूज हळूहळू ब्लड सेल्सला वेढा देऊन रक्त आणि ऑक्सीजनचा पुरवठा बंद करू शकत होते. ज्यामुळे रूग्णाचा जीव गेला असता.
6 / 6
ज्यानंतर डॉक्टरांनी रूग्णाची बायोप्सी केली. ज्यात रूग्णाच्या शरीरात Metastatic Carcinoma असल्याचं समजलं. म्हणजे रूग्णाला ब्रेस्ट कॅन्सरची सुरूवात झाली होती. डॉक्टरांसाठी ही हैराण करणारी बाब होती. कारण आतापर्यंत डॉक्टरांनी ब्रेस्ट कॅन्सरची जेवढी लक्षणं पाहिली, ती सगळी शरीराच्या आत होती. पहिल्यांदाच ब्रेस्ट कॅन्सरचं लक्षण शरीराच्या बाहेर दिसलं. त्यानंतर डॉक्टरांनी रूग्णावर उपचार सुरू केला. जो अजूनही सुरू आहे.
टॅग्स :Breast Cancerस्तनाचा कर्करोगHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य