वजन कमी करायचंय, बीपी नॉर्मल ठेवायचाय? मग दररोज सकाळी प्या 'गरम पाणी'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 11:57 AM2019-07-21T11:57:53+5:302019-07-21T12:10:42+5:30

शरीरासाठी पाणी अत्यंत आवश्यक ठरतं, हे आपण सारेच जाणतो. परंतु, तुम्हाला हे माहित आहे का? दररोज सकाळी अनोशापोटी गरम पाणी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.

गरम पाणी पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतं. आपल्या आहारात अशा अनेक पदार्थांचा समावेश असतो, जे पचण्यासाठी फार जड असतात. तसेच अनेकदा पाचनशक्ती कमकुवत झाल्यामुळे अपचनाच्या समस्यांचा समना करावा लागतो. अशीवेळी गरम पाणी फार मदत करतं. यामुळे पोट साफ होण्यासोबतच पोटाच्या समस्य दूर होण्यासही मदत होते.

पचनक्रिया सुरळीत असेल तर वाढलेलं वजन कमी करण्यासही मदत होते. एवढंच नाहीतर गरम पाणी शरीरात जमा झालेली चरबी कमी करण्यासही मदत करतं.

कोणत्याही कारणामुळे जर पोटाच्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर गरम पाणी पिणं फायदेशीर ठरतं. पण लक्षात ठेवताना पाणी हळूहळू पिणं आवश्यक आहे. जर तुम्ही पटकन गरम पाणी प्यायलात तर ते तुमच्यासाठी घातक ठरू शकत असून अनेक समस्यांचं कारण ठरू शकतं.

सकाळी गरम पाणी प्यायल्याने ब्लड फ्लो आणि सर्क्युलेशन सुधारण्यासाठी मदत होते. तसेच हे ब्लड प्रेशर नॉर्म ठेवण्यासाठीही मदत करतं. (Image Credit : Mental Floss)

अनेकदा सकाळी उठल्यावर खोकला सुरू होतो. अनकेदा तर छातीत जमा झालेला कफ अगदी नकोसा वाटतो. अशातच सकाळी उठून गरम पाणी प्यायल्याने कफ आणि खोकल्याची समस्या दूर होते.

शरीरात जमा झालेले टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी गरम पाणी मदत करतं. एवढचं नाहीतर त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठीही गरम पाणी पिणं हा उत्तम उपाय ठरतो. (Image Credit : Waking Times)

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.