खास चहाबाजांसाठी... रक्तगटानुसार ठरवा कोणत्या चहा प्यायचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 15:15 IST2018-07-20T15:09:30+5:302018-07-20T15:15:43+5:30

O रक्तगट असणाऱ्यांना अनेकदा पोटाच्या समस्या सहन कराव्या लागतात. बऱ्याचदा ते तणावातही असतात. तणाव कमी करण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी O रक्तगट असणाऱ्यांनी आल्याचा चहा, ग्रीन टीचे सेवन करावे. दुधाच्या चहाचे सेवन कमी करावे.

A रक्तगट असणारे लोक प्रचंड मानसिक ताण घेतात. A रक्तगट असणाऱ्यांनी टेन्शन फ्री राहण्यासाठी ओव्याच्या चहाचे सेवन करावे. या चहामुळे उत्तम फायदे शरीरास मिळतात.

B रक्तगट असणाऱ्यांनी ग्रीन टी, लेमन टी आणि तेजपत्त्याच्या चहाचे सेवन करावे. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि पचनक्रियाही सुधारते.

AB रक्तगट असणाऱ्यांना प्रचंड प्रमाणात झोप येते. AB रक्तगट असणाऱ्यांनी चहा आणि कॉफीचे सेवन करूच नये. याऐवजी ग्रीन टी किंवा हर्बल टीचे सेवन करावे.