जादू की झप्पी! जवळच्या व्यक्तीला मिठी मारा अन् 'या' आरोग्यविषयक तक्रारींपासून राहा दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 11:57 AM2024-05-27T11:57:19+5:302024-05-27T12:12:09+5:30

मिठी मारणे ही एक खूप फायदेशीर गोष्ट आहे. जर तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला फक्त 20 सेकंद मिठी मारली तर तुमच्या सर्व समस्या दूर झाल्यासारखं वाटेल.

आनंदाच्या भरात, प्रेम व्यक्त करताना किंवा दु:ख शेअर करताना मिठी मारली जाते. एकही शब्द न बोलता आपल्या भावना समोरच्यापर्यंत पोहचवण्यासाठी मिठी हे अतिशय प्रभावी माध्यम असल्याचं म्हटलं जातं.

आपण अडचणीत किंवा दु:खात असताना किंवा घाबरलेलो असताना आपल्याला कोणी मिठीत घेतलं तर आपल्याला मिळणारा दिलासा हा शब्दात व्यक्त न करता येण्याजोगा असतो.

मिठी मारणे ही एक खूप फायदेशीर गोष्ट आहे. जर तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला फक्त 20 सेकंद मिठी मारली तर तुमच्या सर्व समस्या दूर झाल्यासारखं वाटेल.

अनेक संशोधन आणि अभ्यासात असं आढळले आहे की जवळच्या व्यक्तीला मिठी मारणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते, यामुळे अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात. मिठी मारल्यामुळे शारीरिक आणि मानसिक फायदे होतात, ते जाणून घेऊया...

मिठी मारण्याचे पाच आश्चर्यकारक फायदे आहेत. ते म्हणजे तणाव कमी होतो, वेदना कमी होतात. मन आनंदी होते, हृदयाचं आरोग्य सुधारतं आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

मिठी मारल्याने ‘हे’ तीन हार्मोन्स शरीरातून बाहेर पडतात. 1. डोपामाइन, 2. सेरोटोनिन, 3.ऑक्सिटोसिन

संशोधनात असं दिसून आलं आहे की मिठी मारल्याने तणाव कमी होतो आणि तुमचा मूड हळूहळू सुधारतो. मन प्रसन्न राहते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

10 मिनिटे हात धरून ठेवल्यास आणि 20 सेकंद मिठी मारल्याने तुमच्या रक्तदाबाची पातळी लक्षणीयरीत्या कमी होते.

ज्या वेळी तुम्हाला खूप आत्मविश्वासाची गरज आहे आणि तुमचा आत्मविश्वास कमी होत असेल, तेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराला मिठी मारली पाहिजे, आत्मविश्वास वाढवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.

जवळच्या व्यक्तीला मिठी मारल्याने तुमची भीतीही कमी होते. चिंता आणि तणाव कमी करण्यासाठी मिठी मारणे देखील चांगले आहे. योगप्रणाली या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे.