शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Happy Birthday CR7 : 34 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या तंदुरुस्तीचे रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 9:28 AM

1 / 8
CR7 अर्थात ख्रिस्तियानो रोनाल्डो हा जगातील सर्वात तंदुरुस्त खेळाडू... रोनाल्डोचा आज 34 वा वाढदिवस... वयाची तिशी ओलांडूनही त्याचा खेळ हा २३-२४ वर्षांच्या खेळाडू सारखा आहे.. त्याची गती, चेंडूवर ताबा मिळवण्याचे कौशल्य, एकाग्रता याला तोड नाही. म्हणूनच जगभरात त्याचे चाहते आहेत. त्याची फिटनेस ही चाहत्यांच्या नेहमी चर्चेत राहणारा विषय.
2 / 8
केवळ व्यायाम करून तंदुरुस्ती मिळवता येत नाही त्यासाठी योग्य आहारही तितकाच महत्त्वाचा आहे. रोनाल्डो ही बाब जाणतो आणि युव्हेंटस क्लबचा हा खेळाडू व्यायामासोबतच योग्य आहार याकडेही जातीन लक्ष देतो. त्याचा हा डाएट प्लान जाणून घेवूया...
3 / 8
दिवसाच्या आहाराची योग्य प्रकारे विभागणी केलेली आहे. दिवसभरात 2-4 तासांच्या फरकाने किमान सहावेळा तरी अन्न तो खातो. जेणेकरून शरीरातील मेटाबोलिसम संतुलित राहते.
4 / 8
मसल्समध्ये ताकद येण्यासाठी रोनाल्डो जास्तीत जास्त मांस खातो. पण त्याची अतिरिक्त होऊ देत नाही. प्रोटीन्स ज्यूस, सप्लिमेंट आणि व्हिटामिन यांचे योग्य संतुलन तो राखतो.
5 / 8
वेजेटेबल्समध्ये मिनरल्स आणि व्हिटामिन्सचे प्रामाण अधिक असल्याने त्याच्या आहारात व्हिटामिन्सही असतात. साखरजन्य पदार्थ आणि पेय तो घेत नाही. त्याने शरीरातील फॅट्स वाढत नाही आणि मेटाबोलिझम्सवर ताबा राहतो.
6 / 8
ब्रेकफास्ट : गव्हाचे पदार्थ, अंडी, फळांचा ज्यूस; लंच : गव्हाचा पास्ता, हिरव्या फळभाज्या, उकडलेले बटाटे, सलाडसह चिकन; स्नॅक्स : फळांच्या किंवा लिंबूच्या रसासह टुना रोल; डिनर : डाळ भात, चिकन किंवा टर्कीचं काळीज, बीन्स व फळं.
7 / 8
ख्रिस्तियानो रोनाल्डो हा व्यावसायिक खेळाडू आहे, त्यामुळे तो तज्ज्ञ डाएटिशीयन्स आणि फिटनेस प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वर्कआऊट अर्थात व्यायाम करतो. मँचेस्टर युनायटेड क्लबमध्ये आल्यापासून ते आतापर्यंत रोनाल्डोच्या शारीरयष्टीत अमुलाग्र बदल झालेला जाणवेल.
8 / 8
3-4 तास व्यायाम; कार्डिओ (25-30 मिनिटे धावण्याचे व्यायाम ); चेंडूवर ताबा मिळवण्याचे कौशल्याचा सराव; सहकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष सामन्यात संवाद साधण्याचा सराव.
टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोFitness Tipsफिटनेस टिप्स