FIFA World Cup 2022: १६५ कोटी किंमतीची वर्ल्ड कप ट्रॉफी; विजेत्या संघाला नाही दिली जात खरी ट्रॉफी, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 11:40 AM2022-12-14T11:40:06+5:302022-12-14T11:42:12+5:30

FIFA World Cup 2022 : फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. १८ डिसेंबरला विजेतेपदाची लढत होईल, ज्यामध्ये विजेत्या संघावर पैशांचा वर्षाव केला जाईल.

FIFA World Cup 2022 : फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. १८ डिसेंबरला विजेतेपदाची लढत होईल, ज्यामध्ये विजेत्या संघावर पैशांचा वर्षाव केला जाईल. फुटबॉल वर्ल्ड कप विजेत्या ट्रॉफीची किंमत आणि विजेत्या संघाची बक्षीस रक्कम याबद्दल काही महत्त्वाचं जाणून घेऊयात...

एका अहवालानुसार, यावेळी फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत दिली जाणारी ट्रॉफी ही सर्वात महागडी ट्रॉफी असेल. त्याची किंमत २० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स असल्याचे सांगितले जाते. त्याचे भारतीय चलनात रूपांतर केल्यास त्याची किंमत सुमारे १६५ कोटी रुपये होते.

ट्रॉफीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विजेत्या संघाला खरी ट्रॉफी दिली जात नाही, तर सारखी दिसणारी ट्रॉफी दिली जाते. ज्याला प्रतिकृती ट्रॉफी म्हणतात. यामागे एक किस्सा आहे, प्रत्यक्षात ट्रॉफी दोनदा चोरीला गेली आहे. एकदा ही ट्रॉफी हरवली तेव्हा एका कुत्र्याला ती सापडली. ट्रॉफी एका ठिकाणी कागदात गुंडाळलेली होती.

सुरक्षेच्या दृष्टीने, रिअल ट्रॉफीच्या जागी प्रतिकृती ट्रॉफी नंतर विजेत्या संघाला दिली जाते. स्पर्धेदरम्यान प्रतिकृती ट्रॉफी देखील ठेवली जाते, फक्त वास्तविक ट्रॉफी अंतिम सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये आणली जाते. ही ट्रॉफी स्वित्झर्लंडमध्ये ठेवण्यात आली आहे.

FIFA वर्ल्ड कप विजेत्या संघाला ४२ दशलक्ष डॉलर्स बक्षीस म्हणून दिले जातील. त्याचे भारतीय चलनात रूपांतर केल्यास ते 330 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. २०१८ मध्ये विजेत्या संघाला $38 दशलक्ष बक्षीस रक्कम देण्यात आली. कतार विश्वचषक २०२२ च्या बक्षीस रकमेत ४ दशलक्ष डॉलरची वाढ करण्यात आली आहे.

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यापूर्वी ट्रॉफीचे अनावरण करणार असल्याची चर्चा आहे. असे घडले तर ही पहिलीच वेळ असेल की अभिनेत्री २०१४ च्या अंतिम सामन्यापूर्वी ट्रॉफीचे अनावरण करेल. फुटबॉल वर्ल्ड कप जिंकणार्‍या संघाला मूळ ट्रॉफी दिली जात नाही, तर त्यासारखी दिसणारी ट्रॉफी दिली जाते.