शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मूगाची डाळ शरीरासाठी ठरते फायदेशीर; आहारात करा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 6:26 PM

1 / 7
शरीराला आवश्यक असणारी सर्व आवश्यक पोषक तत्व मिळवण्यासाठी डाळी फायदेशीर ठरतात. डाळींमध्ये प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन बी इत्यादी मुबलक प्रमाणात असतात. प्रत्येक डाळींचे शरीराला होणारे फायदे वेगवेगळे असतात. त्यामुळे अनेकदा डॉक्टरांकडून वाढत्य वयातील मुलांना डाळींचं अधिकाधिक सेवन करण्याचा सल्ला देण्यात येतो. पण तुम्हाला माहीत आहे का? या सर्व डाळींपैकी मुगाच्या डाळींचे शरीराला अनेक फायदे आहेत. जाणून घेऊयात मूग डाळीचे शरीराला होणारे फायदे...
2 / 7
ज्या लोकांना एनीमियाची समस्या होते अशा लोकांनी मूगाच्या डाळीचे सेवन करणं फायदेशीर ठरतं. कारण यामध्ये आयर्नचे प्रमाण अधिक असते. जे शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते.
3 / 7
अनेक व्यक्तींना सांधेदुखीच्या समस्येचा सामना करावा लागतो. अशा व्यक्तींनी मूगाच्या डाळीचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
4 / 7
बद्धकोष्ठाच्या समस्येपासून सुटका करण्यासाठीही मूग डाळ उपयोगी ठरते. त्याचप्रमाणे मूग डाळीच्या सेवनाने पचनक्रीया सुरळीत होण्यासही मदत होते.
5 / 7
लिव्हरच्या समस्येने त्रस्त असणाऱ्या व्यक्तींनी मूगाच्या डाळीचे सेवन करणं गुणकारी ठरतं.
6 / 7
टायफाइड झाल्यावर मूगाच्या डाळीचे सेवन खुप फायदेशीर ठरते. त्यामुळे टायफाइड झाल्यावर आहारात मूगाच्या डाळीचा समावेश करा.
7 / 7
मूगाची डाळ खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. मूग डाळ ही पचण्यास सोपी असते. यामुळे आजारी लोकांनी मूग डाळ खाल्ल्याने फायदा होतो.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य