दोन वर्षांपर्यंत खराब होणार नाहीत 'हे' पदार्थ; अशा पद्धतीने करा स्टोअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 15:22 IST2019-09-15T15:16:08+5:302019-09-15T15:22:48+5:30

फळ, भाज्या आणि धान्यांसारख्या अनेक गोष्टी लवकर खराब होण्याचा धोका असतो. काही वेळा लक्ष नसल्यामुळे स्टोअर केलेल्या या गोष्टी खराब होतात. अशा पदार्थांचं सेवन हे शरीरासाठी अपायकारक ठरू शकतं. दैनंदिन जीवनात वापरणारे खाद्यपदार्थ कसे स्टोअर करायचे हे जाणून घेऊया.

पालेभाज्या लवकर खराब होतात. त्या जास्तवेळ स्टोअर करून ठेवायच्या असतील तर त्या कापून बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवा आणि त्यामध्ये थोडं पाणी आणि ऑलिव्ह ऑईल टाका असं केल्यास त्या वर्षभर टिकतील.

ताजी फळं खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं. मात्र फ्रोजन फ्रूट्स हे जास्त वेळ टिकतात. ते लवकर खराब होत नाहीत.

पीनट, आलमंड आणि काजू बटर खूप दिवस स्टोअर करून ठेवता येतं. चांगल्या डब्ब्यामध्ये बंद करून हे पदार्थ दोन वर्ष ठेवता येतात.

भाज्यांमध्ये अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे भाज्या 18 महीने फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता.

काजू, बदाम, पिस्ता, आक्रोड यासारखे सुका मेवामधील पदार्थ खूप दिवस स्टोअर करून ठेवता येतात. मात्र ते चांगल्या ठिकाणी बंद करून ठेवणे गरजेचे असते.

राजमा, छोले, मटार य़ासारख्या गोष्टी दोन वर्ष स्टोअर करून ठेवू शकता.

















