कॉफीमध्ये एकत्र करा 'हे' पदार्थ अन् पाहा कमाल; होतील अनेक आरोग्यदायी फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 11:53 AM2019-09-15T11:53:16+5:302019-09-15T12:00:25+5:30

कॉफी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायद्यांबाबत तुम्ही ऐकलं असेल, तर जास्त प्रमाणात कॉफीचं सेवन केल्याने शरीराला होणाऱ्या नुकसानाबाबतही तुम्हाला माहीत आहेच. पण तुम्हाला माहीत आहे का? कॅफेन असणाऱ्या या ड्रिंकमध्ये जर तुम्ही काही पदार्थ एकत्र करून प्यायल्याने तुमची झोप तर दूर पळेल पण, अनेक आरोग्यदायी फायदेही होतील.

जर तुम्ही डाएट करत असाल किंवा किटो डाएट फॉलो करत असाल तर कॉफीमध्ये एक टिस्पून सॉल्ट फ्री किंवा क्लिअर बटर एकत्र करा. यामुळे तुमचं पोट जास्त वेळ भरल्याप्रमाणे वाटेल आणि तुम्ही ओव्हर इटिंगपासून दूर राहाल. यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठीही फायदा होतो. तसेच यामुळे गॅसची समस्या किंवा पोटात होणारी जळजळ दूर होण्यास मदत होते.

कॉफीमध्ये मशरूम... ऐकून थोडं विचित्र वाटलं ना? परंतु चागा मशरूममध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. जे शरीरातून टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी मदत करतात. तसेच यामुळे पोटाच्या समस्या दूर होऊन पचनक्रिया सुरळीत होण्यासही मदत होते. या मशरूमची पावडर तुम्ही अगदी सजह ऑनलाइन उपलब्ध होईल.

अश्वगंधाच्या आरोग्यदायी फायद्यांबाबत आयुर्वेदामध्येही सांगण्यात आलं आहे. त्यामुळे एक चमचा अश्वगंधा कॉफीमध्ये एकत्र करून प्यायल्याने कॉफीमधील जी तत्व नुकसानदायी असतात त्यापासून बचाव करण्याचं काम करतात. तसेच यामुळे स्ट्रेस आणि एग्जायटी यांसारख्या समस्यांशी लढण्यास मदत होते.

दालचिनी कॉफीची चव वाढविण्यासाठी मदत करते. तसेच शरीरातील ब्लड शुगर लेव्हल आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करेल.

जर तुम्हाला पोटाच्या समस्यांचा सामना करावा लागत असेल किंवा कॉफी तर प्यायची आहे आणि कॅफेनमुळे चेहऱ्यावरील दूर होणारी चमक वाढवायची असेल. तर त्यासाठी कॉफीमध्ये खोबऱ्याचं तेल एकत्र करा.

टिप : वरील सर्व समस्या आम्ह केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.