कुपोषित डिलिव्हरी बॉय 'जैन अल राफिया' बनला 'ऑस्कर' स्टार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 01:23 PM2019-02-25T13:23:44+5:302019-02-25T13:28:23+5:30

11-12 वर्षाचा जैन अल रफिया हा कुपोषणाचा शिकार बनला होता. कधी काळी रस्त्यावरची कामं करणारा, डिलिव्हरी बॉय असेलला जैन आज तो जगातील सर्वोत्कृष्ट ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात स्टार बनला आहे.

आपल्या कुटुंबीयांना हालाखिच्या परिस्थितीत मदत करण्यासाठी त्याने डिलिव्हरी बॉयचेही काम केलं. सिरीय देशाती हजारो शरणार्थींपैकी तोही लेबिनानमध्ये जगण्याशी संघर्ष करत होता. मात्र, अचानक त्याच्या जीवनात गेम चेंजर बदला घडला अन् कधीही शाळेत न शिकलेला हा थेट ऑस्करवारीवर पोहोचला.

ऑस्करसाठी नामांकन मिळालेल्या 'कैपरनेयाम' या चित्रपटात जैन अल रफियाने भूमिका बजावली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून जैन आणि त्याचे कुटुंब नार्वे येथे राहतेय. तर जैन आणि त्याचे बहिण-भाऊ आयुष्यात पहिल्यांदाच शाळेतही जाऊ लागलेत.

फिल्ममेकर नादिन लाबाकी यांनी बनवलेल्या या चित्रपटात जैन हा एका नागरिकत्व नसलेल्या लेबनान देशातला रहिवासी आहे. त्याच्या आई-वडिलांकडे त्यांच्या जन्माची नोंद करण्यासाठीही पैसे नाहीत.

सिरीयामधील युद्धजन्य परिस्थितीमुळे जैन आणि त्याच्या कुटुंबीयांनी 2012 मध्ये लेबनान येथे स्थलांतर केले. येथे आल्यानंतर युद्धाच्या भितीपासून सुटका झाली, पण काम मिळत नव्हत. मी दिवसरात्र कष्ट करायचो, तरीही घर चालवण जिकरीचं बनलं होत, असंही जैनच्या वडिलांनी सांगितल.

एकेदिवशी जैन हा गल्लीत त्याच्या मित्रांसोबत खेळत होता. त्यावेळी नादिन लाबाकी यांनी त्याला पाहिलं. या गोंडस मुलाच आयुष्य असं रस्त्यावर जाता कामा नये, अशी समजूत त्यंची झाली. त्यातून त्यांनी जैनला चित्रपटात संधी दिली. चित्रपटात प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. तर, जैनच्या कामाच अन् भूमिकेचेही कौतुक झालं. त्यामुळे एका रात्रीत जैनचं आयुष्यच बदलून गेलं.