'यारिया' चित्रपटाला ११ वर्ष पूर्ण! अभिनेता हिमांश कोहलीने शेअर केले सेटवरील Unseen फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 15:33 IST2025-01-10T15:26:31+5:302025-01-10T15:33:25+5:30
दिव्या खोसला कुमार दिग्दर्शित 'यारिया' चित्रपटाला ११ वर्ष पूर्ण झाली आहेत.

१० जानेवारी २०१४ मध्ये आलेल्या 'यारिया' चित्रपटात हिमांश कोहली, रकुल प्रित सिंग यांच्या मुख्य भूमिका होत्या.
त्याचबरोबर चित्रपटात अभिनेते गुलशन ग्रोवर, स्मिता जयकर दिप्ती नवल यांसारखी तगडी स्टारकास्ट होती.
हा चित्रपट सिनेरसिकांच्या पसंतीस उतरला होता.
दरम्यान, आज हा चित्रपट प्रदर्शित होऊन ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने अभिनेता हिमांश कोहलीने सोशल मीडियावर चित्रपटाच्या सेटवरील अनसीन फोटो शेअर केले आहेत.
'यारिया' च्या सेटवरील खास क्षण अभिनेत्याने या फोटोंद्वारे चाहत्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
कॉलेजलमधील मजामस्ती करतानाची दृश्ये त्यासोबतच सहकलाकारांसोबत काढलेले फोटो या पोस्टद्वारे हिमांशने सोशल मीडियावर शेअर केल्याचे पाहायला मिळत आहेत.
"हॅप्पी ११..." असं कॅप्शन त्याने या फोटोंना दिलं आहे.