किस्सा : जेव्हा सलमान खानला दिल्लीतील तरूणीने सर्वांसमोर लगावली होती कानशिलात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 11:55 IST2021-12-17T11:23:29+5:302021-12-17T11:55:46+5:30

Salman Khan : सलमान खान भाऊ सोहेल खान, अभिनेत्री सुष्मिता सेन, शिबानी कश्यप, विजेंदर सिंह आणि इतरही काही सेलिब्रिटींसोबत नवी दिल्लीत पार्टी करत होता.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून तो फॅन्स मनात घर करून आहे. त्याचे सिनेमे फ्लॉप होवोत की सुपरहिट त्याची लोकप्रियता जराही कमी होत नाही. इतकंच काय तर सलमान खानबाबतच्या कॉन्ट्रोवर्सी समोर येऊनही त्याचे फॅन्स त्याला सपोर्ट करतात.

कॉन्ट्रोवर्सीचा विषय निघाला तर सलमान खानचं नाव सर्वात वरच्या क्रमांकाला येतं. कधी काळवीट केस तर कधी हिट अॅन्ड रन केस. कधी कधी तर असं वाटतं की, सलमान खान कॉन्ट्रोवर्सीचं जवळचं नातं आहे.

सलमान खानच्या एका अशाच वादाबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. दिल्लीमध्ये एका अनोळखी तरूणी अभिनेता सलमान खान याला एका भर पार्टीत कानाखाली मारली होती.

ही घटना आहे २००९ मधील. झालं असं होतं की, सलमान खान भाऊ सोहेल खान, अभिनेत्री सुष्मिता सेन, शिबानी कश्यप, विजेंदर सिंह आणि इतरही काही सेलिब्रिटींसोबत नवी दिल्लीत पार्टी करत होता. पार्टी एका ५ स्टार हॉटेलमध्ये सुरू होती. इथे एक फॅशन शो सुद्धा सुरू होता. तेव्हाच नवी दिल्लीतील एका बिल्डरची मुलगी मोनिका या प्रायव्हेट पार्टीमध्ये जबरदस्ती शिरली होती.

मीडिया रिपोर्टनुसार, मोनिकाने पार्टीमधे केवळ सलमान खानला झापडच मारली नाही तर सुष्मिता सेन, सोहेन आणि इतर सेलिब्रिटींना शिव्याह द्यायला सुरूवात केली होती.

रिपोर्टनुसार, 'शिव्या देणारी मुलगी मोनिकाने तिच्या एका मित्रासोबत जबरदस्ती प्रायव्हेट पार्टीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी ती पूर्णपणे आउट ऑफ कंट्रोल होती. सोहेल खानने गार्डला मोनिकाला आत जाऊ देण्यास सांगितलं.

या दरम्यान सलमानने गोंधळ ऐकला आणि तो तिकडे गेले जिथे मोनिका गोंधळ घालत होती. ती अचानक सुष्मिता सेनला शिव्या देऊ लागली होती. जेव्हा सलमाने नम्रपणे तिला तेथून जाण्यास सांगितलं तेव्हा तिने अचानक सलमान खानच्या कानशिलात लगावली.

असाही खुलासा झाला होता की, या घटनेनंतरही सलमान खान रागावला नव्हता. त्याने संतापण्याऐवजी सिक्युरिटी गार्ड्सना तरूणीला पार्टीबाहेर काढण्यास सांगितलं होतं.

सलमान खान नेहमीच एंग्री यंग मॅनच्या इमेजसाठी ओळखला जातो. मात्र, त्याच्या पार्टीमधील वागणुकीने सर्वांना हैराण केलं होतं. यानंतर त्याच्या फॅन्सच्या मनात त्याच्या विषय आणखी प्रेम वाढलं.