Vaishali Takkar Suicide : "इंटीमेट फोटोंची भीती, लग्न मोडण्याचं टेन्शन"; 'अशी' होती आत्महत्येपूर्वी वैशाली ठक्करची मनस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 12:38 IST2022-10-25T12:20:37+5:302022-10-25T12:38:11+5:30

Vaishali Takkar Suicide : आत्महत्येपूर्वी वैशालीची मनस्थिती नेमकी कशी होती याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री वैशाली ठक्कर (Vaishali Takkar)ने गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या निधनामुळे चाहत्यांना खूप दुःख झाले आहे. वैशाली आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलेल याची कल्पनाही कोणी केली नव्हती. मृत्यूनंतर वैशालीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने जीवन मौल्यवान असल्याचे सांगितले.

वैशाली ठक्करने हा व्हिडीओ तिच्या यूट्यूब अकाऊंटवर 20 सप्टेंबरला शेअर केला होता. त्याचे शीर्षक होते 'मेरे जैसे जिंदगी की झंड ना करना...' या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. वैशालीचा हा व्हिडिओ हॉस्पिटलमध्ये बनवण्यात आला होता. तिला व्हायरसची लागण झाली होता, त्यामुळे वैशालीला रुग्णालयात दाखल करावे लागले होते.

व्हिडिओमध्ये वैशाली चाहत्यांना जीवन मौल्यवान आहे, असे सांगत आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले आहेत. वैशालीच्या आत्म्याला शांती लाभो, अशी लोक प्रार्थना करत आहेत. याच दरम्यान आता आत्महत्येपूर्वी वैशालीची मनस्थिती नेमकी कशी होती याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

वैशाली गेल्या काही काळापासून डिप्रेशनमध्ये होती. त्यातून बाहेर पडण्यासाठी ती सायकॅट्रिस्टची मदत घेत होती. आत्महत्या करण्यापूर्वी तिची मनस्थिती कशी होती याची माहिती तिचा मित्र निशांत सिंग मल्कानी यांनी दिली आहे. "राहुल वैशालीला मुव्ह ऑन करू देत नव्हता. ती डिप्रेशनमध्ये आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तिने आपल्याशी चार दिवस आधी संवाद साधला होता" असं निशांत यांनी सांगितलं.

निशांत मल्कानी यांनी ई टाईम्सशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही महत्त्वाची माहिती दिली. वैशाली डिप्रेशनमध्ये होती आणि ती मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घेत होती. तिला किती त्रास होत होता आणि ती किती डिप्रेशनमध्ये होती याचा आता मला अंदाज येत आहे, असं निशांतने सांगितलं आहे.

राहुल हा वैशालीच्या होणाऱ्या नवऱ्याला तिचे इंटीमेट फोटो दाखवणार होता. तुम्ही जर एखाद्यासोबत रिलेशनशीपमध्ये असाल तर इंटीमेसी सामान्य गोष्ट आहे. याचा अर्थ असा नाही की ब्रेकअप झाल्यानंतर या फोटोवरून तुम्ही कुणाला धमकवायला हवं, असंही त्याने म्हटलं आहे.

वैशालीने आत्महत्या करण्याच्या चार दिवस आधी माझं तिच्याशी बोलणं झालं होतं. तिने वजन कमी केल्याने मी तिला चिडवायचो. मी पुन्हा रिकव्हर करेल असं ती नेहमी म्हणायची. लग्नापूर्वी मुंबईत येणार असल्याचंही तिने मला सांगितलं होतं, अशी माहितीही निशांत यांनी दिली.

जेव्हा वैशाली आणि राहुलने एकमेकांशी डेट करण्यास सुरुवात केली. तेव्हा राहुल विवाहित नव्हता. या दोघांच्या नात्याशी त्याचे नातेवाईक सहमत नव्हते. त्यामुळे त्यांचा विवाह झाला नाही. मात्र दिशा सोबत विवाह केल्यानंतर राहुल वैशालीला इमोशनली ब्लॅकमेल करत होता. तिला तो मुव्ह ऑन करू देत नव्हता.

वैशालीला आपली कदर करणाऱ्या व्यक्तीशी लग्न करायचं होतं. अशातच तिचं लग्न ठरलं. त्यामुळे ती खूप खूश होती, असंही त्यांनी सांगितलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. वैशालीने आपल्या सुसाईड नोटमध्ये आपल्या मृत्यूसाठी राहुल आणि त्याची पत्नी दिशा यांना जबाबदार धरले आहे.

वैशाली ठक्करच्या निधनामुळे मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. वैशालीचे जवळचे मित्र आणि तिचे कुटुंबीय हैराण आहेत. वैशालीने तिच्या वेदना एका डायरीत लिहिल्यात आहेत. पाच पानी सुसाईड नोटमध्ये अभिनेत्रीने तिच्या मृत्यूसाठी शेजारी राहूल नवलानी आणि दिशा यांना जबाबदार धरले. यासोबतच या दोघांनाही शिक्षा देण्याची विनंती केली. (फोटो - सोशल मीडिया)