कॅन्सरशी दोनदा लढाई जिंकलेली 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री व्हेंटिलेटरवर; स्ट्रोकने बिघडली प्रकृती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 15:20 IST2022-11-03T14:51:34+5:302022-11-03T15:20:48+5:30

Aindrila Sharma : बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री एंड्रिला शर्मा (Aindrila Sharma) हिला पुन्हा एकदा स्ट्रोक आला आहे.

बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री एंड्रिला शर्मा (Aindrila Sharma) हिला पुन्हा स्ट्रोक आला आहे. तिच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या (ब्लड क्लॉट्स) जमा झाल्या आहेत. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एंड्रिलाला सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

एंड्रिलाने याआधी दोनदा कॅन्सरशी सामना केला आणि तो लढा जिंकला आहे. यानंतर आता ती पुन्हा व्हेंटिलेटर असल्याच्या बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. तिचे मित्र-मैत्रिणी आणि चाहते ती लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थना करत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एंड्रिला शर्माची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. एंड्रिलाची अचानक प्रकृती बिघडली आहे. तिच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या जमा झाल्या असून अभिनेत्री व्हेंटिलेटरवर असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ती हावडा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. एंड्रिला शर्माने यापूर्वी दोनदा कॅन्सरशी लढाई जिंकली आहे. दुसऱ्यांदा कॅन्सरशी लढा जिंकून तिने अभिनय क्षेत्रात पुनरागमन केले.

अभिनेत्रीवर गंभीर शस्त्रक्रियाही झाली आहे. तिने किमोथेरपी देखील घेतली आहे आणि ती केल्यानंतर तिला डॉक्टरांनी कॅन्सरमुक्त घोषित केले आहे. अभिनेत्रीची आता प्रकृती पुन्हा बिघडली आहे. त्यामुळे तिचे संपूर्ण कुटुंब आणि चाहते अतिशय दुःखी आहे.

एंड्रिलाने दोन ओटीटी प्रोजेक्टमध्ये काम केले आहे. 'झुमुर' या टीव्ही शोमधून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर अनेक लोकप्रिय शोमध्ये काम केले. Jibon Jyoti, ‘Jiyon Kathi’ मध्ये ती मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. (सर्व फोटो - सोशल मीडिया)